ऐन प्रचाराच्या वेळी कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. मात्र, प्रचाराची सांगता झाली अन् वातावरणातही बदल झाला.
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) जाहीर प्रचाराची सोमवारी (ता. ८) सांगता झाली असून आज बुधवारी (ता. १०) मतदान होणार आहे. मात्र, सध्या पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे.
हवामान खात्याच्या (Meteorology Department) अंदाजानुसार, आणखी दोन दिवस वळिवाची शक्यता आहे. त्याचा परिणाम मतदानावर (Voting) होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, मतदारांना सकाळच्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन केले जात आहे. बुधवारी अधिकाधिक मतदान होण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी कंबर कसली आहे.
ऐन प्रचाराच्या वेळी कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत होती. मात्र, प्रचाराची सांगता झाली अन् वातावरणातही बदल झाला. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होण्यासह वळीव बरसत आहे. सायंकाळच्या टप्प्यात पाऊस हजेरी लावत असून आजही पावसाची शक्यता आहे.
बुधवारी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली आहे. मात्र, सायंकाळी पाऊस झाल्यास मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस जोरात वळीव होत आहे. तसेच वातावरणही बदलत आहे. यामुळे उमेदवारांची चिंता वाढू लागली आहे.
मतदान केंद्राबाहेर स्लीप देण्यासाठी टेबलची मांडणी केली जाते. पाऊस पडल्यास यांनाही अडचण होणार आहे. पाऊस झाल्यास वयोवद्धही घराबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शक्यतो सकाळच्या टप्प्यातच मतदान करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशासनाने व्यापक जागृती केली आहे. त्यामुळे मतदारांना मतदान करावे, असे आवाहन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.