Karnataka Election : बोहल्यावर चढण्याआधी बजावले राष्ट्रीय कर्तव्य; 'या' नववधूच्या निर्णयाची गावात चर्चा

मलिकवाड येथील एका तरुणानेही लोकशाहीच्या या कर्तव्याप्रती सजग राहून बोहल्यावर चढण्यापूर्वी आधी मतदान केले.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023esakal
Updated on
Summary

विशेष म्हणजे, मतदान करताना त्याने नवरदेवाचा पोशाख घातला होता. मतदान हे आपले कर्तव्य आहे.

मलिकवाड : लोकशाहीतील (Democracy) सर्वांत मोठा उत्सव म्हणजेच निवडणूक. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, म्हणून निवडणूक आयोग (Election Commission) तसेच तालुका प्रशासनातर्फे विविध अभियान राबविण्यात आले होते.

मलिकवाड येथील एका तरुणानेही लोकशाहीच्या या कर्तव्याप्रती सजग राहून बोहल्यावर चढण्यापूर्वी आधी मतदान केले. योगेश दीपक जाधव असे या युवकाचे नाव आहे.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Election : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस युती होणार? युतीबाबत डीकेंचं मोठं वक्तव्य

चिक्कोडी तालुक्यातील (Chikkodi Taluka) मलिकवाड येथे राहणाऱ्या व व्यवसायाने केमिस्ट आणि ड्रगिस्ट असणाऱ्या योगेशने ‘आधी मतदान, मग लग्न’ असे सांगून आपले कर्तव्य पार पाडले. मलिकवाड येथील रहिवासी असलेल्या योगेशचे काल कोरोची, इचलकरंजी येथे लग्न होते. लग्नाच्या दिवशी घाईगडबड असतानाही त्याने सकाळी सकाळीच मलिकवाड येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

Karnataka Assembly Election 2023
Solapur : 'ऐलान हो चुका है, मगर..'; पंढरपुरातून मुंबईला पोहचण्यासाठी अभिजीत पाटलांना गाठावा लागणार मोठा टप्पा

विशेष म्हणजे, मतदान करताना त्याने नवरदेवाचा पोशाख घातला होता. मतदान हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे निवडणुकीपूर्वी सांगण्यात येते. त्यानुसार योगेशनेही मतदान हे कर्तव्य समजत बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केले.

Karnataka Assembly Election 2023
Sangola : आमदार रवींद्र धंगेकरांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते का झाला? राजकीय चर्चांना उधाण

या मतदानानंतर त्याचे इतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनीही मतदान केले. योगेशचे वडील दीपक जाधव हे नणदी येथील कृषी पत्तीन संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक असून, सामाजिक उपक्रमातही सक्रिय असतात. लोकशाहीच्या या मूलभूत कर्तव्याबद्दल जाधव कुटुंबीयांचे गावात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.