Karnataka Assembly Election Results 2023 : भाजपला धक्का! येडियुरप्पांचा मुलगा विजयेंद्र ४ हजार मतांनी पिछाडीवर

Karnataka Assembly Election Results
Karnataka Assembly Election Results Esakal
Updated on

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर दिसून येत आहे. याठिकाणी भाजपला धक्का बसताना दिसून येत आहे. अशातच भाजपचे 8 कॅबिनेट मंत्री देखील पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र ही देखील पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुलाला शेवटच्या टप्प्यात उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. स्वत: अमित शाह यांनी येडियुरप्पा यांचे पुत्र बीवाय विजयेंद्र यांची भेट घेतली होती. मात्र या निवडणूक बीवाय विजयेंद्र पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे अनेक मोठे नेते पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या टप्प्यात 19 सभा आणि रोड शो केले होते. मात्र तयारी करूनही भाजप पिछाडीवर दिसून येत आहे. दक्षिणेकडे एकमेव राज्य भाजपकडे होतं. मात्र येथे भाजपला मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. कर्नाटकची जनता दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या पक्षांना संधी देते. तीच परंपरा यावर्षीही कर्नाटकच्या जनतेने कायम ठेवली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. एकूण 224 मतदारसंघांचे निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत एकूण 2,615 उमेदवार उभे होते. त्यामुळे या सर्व उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Karnataka Assembly Election Results
Cabinet Expansions: कोणाच्या दारापुढे ‘लाल’ दिव्याची गाडी? मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला मिळणार संधी

कर्नाटकात मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. तर जेडीएस पक्ष या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका निभावण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजप ही सत्ता राखण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर भाजपचे दक्षिण भारतातील वर्चस्व कमी होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील या एकमेव राज्यात भाजपला सत्ता टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

Karnataka Assembly Election Results
Karnataka Assembly Election Results 2023 : भाजपला मोठा धक्का! भाजपचे 8 कॅबिनेट मंत्री पिछाडीवर

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान पार पडलं होतं. राज्यात मतदानासाठी 58,545 मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. या निवडणुकीत उभ्या असलेल्या 2,615 उमेदवारांचा फैसला 5.31 कोटी मतदार करणार आहेत. राज्यात 73.19 टक्के मतदान झालं. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात विधानसभेच्या 224 जागा आहेत. तसेच बहुमतासाठी 113 चा आकडा आवश्यक आहे.

Karnataka Assembly Election Results
Karnataka Election Result : निकालाआधीच काँग्रेसमध्ये दोन गट? राजकीय घडामोडींना वेग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.