Yoga Teacher: 'मागच्या जन्मात आपण प्रेमी होतो' सांगत योगा गुरुने घेतला फायदा; NRI महिलेवर लैंगिक अत्याचार

Yoga guru arrested in a rape case: पोलिसांनी प्रदीप उल्लाल (वय ५४) नावाच्या योगा गुरुला अटक केली आहे. प्रदीप हा चिकमंगळुरु येथे केवला फाऊंडेशन चालवतो.
Pradeep Ullal
Pradeep Ullal esakal
Updated on

Yoga teacher in Karnataka’s Chikkamagaluru Arrested for Sexual Abuse Case: चिकमंगळुरु पोलिसांनी एका NRI महिलेवर बलात्कार करणाऱ्या योगा गुरुला अटक केली आहे. योगा गुरुने आपले मागच्या जन्मीचे संबंध असल्याचं सांगत लैंगिक अत्याचार केल्याचा दावा महिलेने केला आहे. 'डेक्कन हेराल्ड'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

योगाचे ऑनलाईन क्लास घेणाऱ्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिने दावा केलाय की, तिला चिकमंगळुरीतील मल्लेनहाली येथील योगा सेंटरमध्ये २०२१ आणि २०२२ मध्ये तीनवेळा बोलावण्यात आले होते. याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.

Pradeep Ullal
Kolkata rape murder case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीला जेलमध्ये हवंय अंडा चाऊमीन, पुढे काय झालं?

पोलिसांनी प्रदीप उल्लाल (वय ५४) नावाच्या योगा गुरुला अटक केली आहे. प्रदीप हा चिकमंगळुरु येथे केवला फाऊंडेशन चालवतो. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, ती मुळची पंजाबची आहे. 2000 सालापासून ती अमेरिकेच्या कॅलिफॉर्निया येथे राहते. ती तीनवेळा भारतात आली होती. यावेळी प्रदीप उल्लालने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.

उल्लालने महिलेला सांगितलं की त्यांच्या दोघांचा मागच्या जन्मी संबंध होता. ते प्रेमी होते. तो आध्यात्म, एनर्जी वर्क आणि पवित्र प्रेमाबद्दल सांगायचा आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. महिलेने तक्रारीत असंही म्हटलं आहे की, ती गरोदर झाली होती. त्यानंतर तिचा गर्भपात झाला. चिकमंगळुर पोलिसांनी याप्रकरणी कलम 376(2)(n) अंतर्गत (एकाच महिलेवर अनेकवेळा बलात्कार करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Pradeep Ullal
Latur rape-murder: ७० वर्षीय महिलेचा केला खून अन् चार दिवस करत राहिला बलात्कार; लातूरमध्ये घृणास्पद प्रकार

कोण आहे प्रदीप उल्लाल?

उल्लाल हा पूर्वी दुबईमध्ये होता. त्यानंतर तो बेंगळुरीमध्ये स्थायिक झाला आहे. दुबईमध्ये असताना त्याने योगा क्लास सुरु केला होता. २०१० मध्ये त्याने भारतात चिकमंगळुरू येथे तीन एकर जमीन खरेदी केली. पोलिसांनी सांगितलं की, तो लोकांना हिमालयात पर्यटनासाठी घेऊन जायचा. त्याचे अनेक विद्यार्थी आहेत. प्रामुख्याने तो ऑनलाईन क्लासेस घेतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.