Shocking School Incident: धक्कादायक! पेन चोरीला गेल्याने तिसरीच्या विद्यार्थ्याला जळत्या लाकडाने मारले, अनेक दिवस अत्याचार

Student Abuse in Karnataka School : बाल हक्क कार्यकर्ते सुधर्शन यांनी सांगितले की, मुलाची सुटका करण्यात आली आहे आणि हा मुद्दा महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या सरकारी अधिकाऱ्यांशी उचलण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
 Karnataka Third-Grader Beaten with Burning Wood
Karnataka Third-Grader Beaten with Burning Woodesakal
Updated on

कर्नाटकच्या रायचूर येथील रामकृष्ण आश्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याला पेन चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे. आरोपींनी तीन दिवस त्याला खोलीत बंद करून ठेवले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तरुण कुमार या मुलावर आश्रमातील प्रमुख वेंगोपाळ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अत्याचार केले. त्याला जळत्या लाकडाने मारले आणि जखमी केले.

मुलाने सांगितले की, "दोन मोठ्या मुलांनी आणि एका शिक्षकाने मला मारहाण केली. त्यांनी मला जळत्या लाकडाने मारले, ते तुटल्यावर बॅटने मारले. त्यांनी माझ्या अंगावर चिरा पाडल्या. त्यांनी मला रेल्वे स्थानकावर भिक्षा मागायला यागदिरला नेले."

कुटुंबीयांचा आरोप आणि मुलाची व्यथा

तरुण कुमारच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आश्रमात राहत होता. खेळताना त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्यावर पेन चोरीचा आरोप केला आणि हे प्रकरण आश्रम प्रशासनापर्यंत पोहोचले. त्याच्या आईने आश्रमाला भेट दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

तरुणची आई म्हणाली, "माझ्या मुलाचे नाव तरुण कुमार आहे. तो इयत्ता तिसरीत आहे. माझा दुसरा मुलगा, अरुण कुमार, पाचव्या वर्गात आहे. मी दोघांनाही आश्रमात ठेवले होते. जेव्हा मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा माझा मोठा मुलगा अरुण यांने मला तरुणवर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले."

 Karnataka Third-Grader Beaten with Burning Wood
Himachal Pradesh Rain : ढगफुटीत ५० जण दगावल्याची भीती ; हिमाचलमध्ये वेगाने बचाव कार्य ,तीनशे कोटींच्या प्रकल्पालाही फटका

पेन चोरीचा आरोप फेटाळला-

मुलाची आई म्हणाली की, "माझ्या मुलाने फक्त पडलेला पेन उचलला आणि दुसरीकडे ठेवला. शनिवारी दुसऱ्या मुलाने त्याच्या मुलाला शिक्षकाचा पेन दिला कारण त्याच्याकडे पेन नव्हता. रविवारी शिक्षकाने पेन शोधताना तो माझ्या मुलाकडे सापडला आणि ही संपूर्ण घटना घडली."

अत्याचाराच्या विरोधात तक्रार-

बाल हक्क कार्यकर्ते सुधर्शन यांनी सांगितले की, मुलाची सुटका करण्यात आली आहे आणि हा मुद्दा महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या सरकारी अधिकाऱ्यांशी उचलण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तरुण कुमारला अनेक जखमा झाल्या आहेत आणि त्याचे डोळे पूर्णपणे सुजलेले आहेत. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 Karnataka Third-Grader Beaten with Burning Wood
Ayodhya : तडजोडीसाठी काही जणांकडून दबाव ; पीडितेच्या आईने बसपच्या शिष्टमंडळाकडे तक्रार केल्याचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.