Fact Check Unit: फेक न्यूज तपासण्यासाठी राज्यस्तरीय 'फॅक्ट-चेक यंत्रणा'; CM सिद्धरामय्यांचा मोठा निर्णय!

Fact Check Unit
Fact Check Unit
Updated on

Fact Check Unit: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी राज्यात 'फॅक्ट चेकिंग युनिट' स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. सिद्धरामय्या यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बनावट बातम्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण बनावट बातम्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत आणि समाजाचे ध्रुवीकरण करतात.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासी कार्यालय 'कृष्णा' येथे सायबर सुरक्षेबाबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिद्धरामय्या यांनी बनावट बातम्या आणि त्यामागील रॅकेट उघड करणे, बनावट बातम्यांचा प्रसार थांबवणे आणि आरोपींना कठोर शिक्षा करणे या त्रिसूत्रीला मान्यता दिली.

इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे यांच्या अधिकारात हे युनिट काम करेल. (Karnataka latest news)

Fact Check Unit
Road Accident : मालवाहू गाडीच्या धडकेत चार शाळकरी मुलं ठार, तीन जखमी; शिकवणी संपवून घरी परतताना दुर्घटना

फॅक्ट चेक युनिटमध्ये एक पर्यवेक्षण समिती, नोडल अधिकारी, एक तथ्य शोध समिती आणि क्षमता-निर्मिती टीम यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.  

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बनावट बातम्या ओळखणे महत्वाचे आहे, असे मत खर्गे यांनी व्यक्त केले आणि आश्वासन दिले की इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान विभाग यामध्ये संपूर्ण मदत करेल. मात्र, नंतरच्या टप्प्यात ते गृह विभागाच्या अखत्यारीत यायला हवे, असेही ते म्हणाले. (latest marathi news)

खोट्या बातम्या पसरवणे हा गुन्हा आहे याची जाणीव सर्वसामान्यांना असली पाहिजे, असे आवाहन महसूल मंत्री कृष्णा बायरे गौडा यांनी केले.

Fact Check Unit
Tukaram Mundhe : कामात दिरंगाई केल्याचा तुकाराम मुंढेंवर ठपका; नियमबाह्यपणे कंत्राट दिल्याचीही तक्रार, अडचणींमध्ये वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.