CM Siddaramaiah : 'धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा'; मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे शिफारस

देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले, तरी सर्व समुदायाला सामाजिक न्याय मिळाला नाही.
Dhangar Community CM Siddaramaiah
Dhangar Community CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस धनगर समाजाच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

बेळगाव : धनगर समाजाचा (Dhangar Community) समावेश अनुसूचित जमातीत करण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. या मागणीबाबत केंद्राकडे सतत पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी दिली आहे.

Dhangar Community CM Siddaramaiah
वाघनखांवरुन राजकारण तापलं! 'आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील'; मंडलिक, मुश्रीफांचा निशाणा

येथे मंगळवारी (ता. ३) शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनलतर्फे अखिल भारतीय नववे अधिवेशन (मेळावा) झाला. यावेळी मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या या मेळाव्याचे उद्‌घाटन हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फागुणसिंग कुलास्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाले, तरी सर्व समुदायाला सामाजिक न्याय मिळाला नाही. आजही अनेक जमातीच्या लोकांना विधानसभेची पायरी चढणे शक्य झाले नाही. यामुळे सर्व समाजाच्या समुदायाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे.’

Dhangar Community CM Siddaramaiah
Eid-e-Milad : शिमोगात 'ईद-ए-मिलाद'च्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक; 40 जण ताब्यात, तब्बल अडीच हजार पोलिस तैनात

राज्यपाल बंडारू दत्तात्रेय म्हणाले, ‘समाज बांधवांनी शिक्षणाला प्राधान्य द्यावे. समाजहितासाठी काम करून राजकीय क्षेत्रातही अधिक संधी समाज बांधवांना मिळावी, यासाठी समाज बांधवांना एकसूत्रात बांधणे आवश्यक आहे. देशभरातील समाजबांधव वेगवेगळ्या नावाने परिचित असून समाजाने एकत्रित येऊन काम केल्यास निश्चितच समाजाचा विकास होणे शक्य आहे.’

शेफर्ड्स इंडिया इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ यांनी, देशभरात धनगर समाजाचे १२ कोटींहून अधिक समाजबांधव आहेत. या सर्वांना संघटित करणे या संघटनेचा उद्देश आहे. पुढील दहावे अधिवेशन दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.

Dhangar Community CM Siddaramaiah
Udayanraje Bhosale : 'शंभूराज देसाईंची चप्पल साडेतीनशे रुपयांची, कोणी चोरली का बघा..'; असं का म्हणाले उदयनराजे?

माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी विविध ठरावांचे वाचन केले. नंदगड येथील संगोळी रायण्णा यांच्या फाशीच्या स्थळास राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, प्रत्येक गावात बकरी चारण्यासाठी माळरानाची व्यवस्था करावी, समाज बांधवांना शिक्षण, आरोग्य आदी सुविधा लागू कराव्यात, अशा विविध ठरावांचे वाचन करून मागणीचे निवेदन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिले.

मेळाव्यास कागिनेले कणकगुरु पिठाचे श्री निरंजनानंद स्वामीजी, विश्वानंदपुरी स्वामीजी, सिद्धाराम नंदपुरी स्वामीजी आणि अर्जुनानंदपुरी स्वामीजी यांचे सानिध्य लाभले होते. नगर विकास मंत्री भैरती सुरेश, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, आमदार प्रकाश हुक्केरी, विश्वास वैद्य, महांतेश कौजलगी, चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह महाराष्ट्राचे माजी दुग्ध संवर्धन मंत्री महादेव जानकर, दत्तात्रेय भरणे, राम शिंदे, भूषणराजे होळकर, राज्यभरातील समाज बांधव आणि गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू-काश्मीर, तमिळनाडूतील हजारो समाज बांधव उपस्थित होते.

Dhangar Community CM Siddaramaiah
Yellamma Devi : सौंदत्ती रेणुका देवीच्या चरणी भाविकांकडून भरभरुन दान; तब्बल 1 कोटी 3 लाख दानपेटीत जमा

‘लोकसभेसाठी उमेदवारी देणार?’

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेस धनगर समाजाच्या पाठिशी असल्याचे सांगितले. येत्या लोकसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील दोनपैकी एका जागेवर समाजाला उमेदवारी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लिंगायत आणि धनगर समाजाचे ऋणानुबंध कायम असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()