बंगळुरु : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला, त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पहिला आदेश काढला. या आदेशानुसार, कर्नाटकातील प्रत्येक महिला कुटुंब प्रमुखाला दरमहा २००० रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच 'अन्नभाग्य योजना' राबवण्याचे आदेश देण्यात आले. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात याची घोषणा केली होती. (Karnataka CM Siddaramaiah first order after swearing in ceremony regarding women and family)
कर्नाटकात सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गृहलक्ष्मी योजना राबवण्याचे आदेश दिले. या योजनेंतर्गत कर्नाटकातील प्रत्येक महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा २००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
या योजनेची घोषणा करताना सिद्धरामय्या म्हणाले, "आम्ही निवडणूक जाहिरनाम्यात जनतेला पाच वचन दिले होते. या पाच वचनांचं पालन करण्याचे आदेश पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर देण्यात आले आहेत. या सर्व योजना पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लागू होतील. पुढची बैठक आठवड्याभरातच घेतली जाणार आहे" कर्नाटकच्या विधानसभेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धरामय्या बोलत होते.
काय आहेत काँग्रेसच्या जाहिरनाम्यातील पाच घोषणा
१) गृहलक्ष्मी योजना - प्रत्येक कुटुंबप्रमुखाला दरमहा 2000 रुपये आर्थिक मदत देणार
२) गृहज्योती योजना - प्रत्येक कुटुंबाला दरमला २०० युनिट मोफत वीज देणार
३) युवानिधी योजना - बेरोजगार पदवीधरांना (१८ ते २५ वयोगट) दरमहा ३००० रुपये तर डिप्लोमाधारक बेरोजगाराला दरमला १५०० रुपये देणार
४) शक्ती योजना - सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास
५) अन्न भाग्य योजना - दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दरमहा १० किलो तांदूळ देणार
कर्नाटकातील सर्व वर्गातील नागिरकांसाठी काँग्रेसनं या योजना जाहिरनाम्यात घोषीत केल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.