Loksabha Election : आता मिशन लोकसभा! आमदार-मंत्र्यांमधील वाद मिटवून मुख्यमंत्र्यांनी आखली मोठी रणनीती, दिले महत्वाचे आदेश

काँग्रेस आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राबवत आहे नियोजनबद्ध रणनीती
Karnataka CM Siddaramaiah
Karnataka CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या जेवणासाठी ब्रेक न घेता बैठकीतच जेवण केले आणि आमदारांच्या मागण्या व समस्या संयमाने ऐकून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

बंगळूर : ‘‘काँग्रेसने (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) रणनीती राबवत आहे. त्यासाठी मंत्री व आमदारांच्या जिल्हानिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करा’’, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केली.

मंगळवारी बेळगाव जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन त्यांनी आवाहन केले. ते म्हणाले, ‘‘पाच हमी योजनांच्या बळावर राज्यात सत्तेवर आलेली काँग्रेस आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नियोजनबद्ध रणनीती राबवत आहे. आमदार आणि मंत्र्यांमधील मतभेद मिटवल्यानंतर आता पक्षाचे लक्ष लोकसभा निवडणुकीकडे लागले आहे.

Karnataka CM Siddaramaiah
Ambadas Danve : 'शिवसेना त्या गद्दारांकडं आता ढुंकूनही पाहणार नाही'; दानवेंचा शिंदे गटावर जोरदार प्रहार

त्यानुसार त्या त्या जिल्ह्यांमध्ये पक्षाचे आमदार, मंत्र्यांच्या बैठका घेऊन प्रोत्साहन दिले जात आहे.’’ यावेळी संबंधित मंत्र्यांनी खासदारांच्या मतदारसंघाचा विकास, अनुदान आणि लोकसभा निवडणुकीची तयारी याबाबत चर्चा केली. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून सुरुवात करून अधिकाधिक जागा विचारात घ्याव्यात, असे आवाहनी त्यांनी केले.

Karnataka CM Siddaramaiah
Kolhapur : ओबीसी कोट्यातूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, अन्यथा उग्र आंदोलन छेडणार; मराठा समाजाचा थेट इशारा

पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत मुख्यमंत्र्यांनी विविध जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली तर मंगळवारी सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत मुख्यमंत्र्यांनी ५० आमदारांसोबत सलग बैठका घेतल्या. रायचूर, विजयपूर, कोप्पळ, हावेरी, बेळगाव, गुलबर्गा जिल्ह्याचे मंत्री आणि सचिव यांच्या समवेत मंत्री व आमदारांच्या बैठकीत विकास कामे, आवश्यक अनुदान, बदल्या, परस्पर समन्वय आणि लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा केली.

आमदारांच्या कोणत्याही समस्यांकडे संबंधित जिल्हा पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे. जर ते त्यांच्या क्षेत्रातील समस्या आणि मागण्या सोडवू शकत असतील, तर त्यांनी त्वरित प्रतिसाद द्यावा. जर त्यांना ते शक्य नसेल तेव्हाच त्यांनी माझ्या निदर्शनास आणून द्यावे. मंत्र्यांनी आमदारांशी समन्वय साधावा.

Karnataka CM Siddaramaiah
Car Accident : देवदर्शनासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला; कार अपघातात तीन जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी

त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांना वेळ द्यावा. त्यांच्या तक्रारींना मंत्री प्रतिसाद देत नसतील तर आमदार थेट माझ्या निदर्शनास आणू शकतात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते. या बैठकीत प्रियांक खर्गे, शरणप्रकाश पाटील, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, शिवराज तंगडगी, शिवानंद पाटील असे जिल्हा पालकमंत्री आणि संबंधित जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेतला.

Karnataka CM Siddaramaiah
INDIA Alliance : देशात 'इंडिया अलायन्स' भक्कम, शरद पवार सुद्धा..; उलट-सुलट चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

जेवणालाही ब्रेक नाही

मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या जेवणासाठी ब्रेक न घेता बैठकीतच जेवण केले आणि आमदारांच्या मागण्या व समस्या संयमाने ऐकून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()