नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवत १३५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या मोठ्या विजयानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यासंदर्भातील अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडं सोपवला आहे. त्यामुळं येत्या २४ तासांत या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Karnataka Congress central observers submitted report on opinion of MLAs on CM to Mallikarjun Kharge)
एएनआयच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री निवडीबाबत नुकतीच काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत आमदारांचं मत काय आहे, याचा अहवाल कर्नाटकातील काँग्रेसच्या केंद्रीय निरिक्षकांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडं पाठवला आहे.
यानंतर या अहवालावर खर्गे युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. यानंतरच मुख्यमंत्री कोण होईल? हे अंतिम होईल आणि त्याच्या नावाची घोषणाही होईल. त्यामुळं आता येत्या २४ तासात कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होईल? याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रसचे राज्यातील ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार हे दोघे आहेत. या दोन्ही नेत्यांना आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं ही आशा असून त्यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. यापैकी सिद्धरामय्या आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून आहेत. तर डीके शिवकुमार यांनी आजारी असल्याचं कारण सांगत आज दिल्लीला गेलो नसल्याचं सांगितल. पण उद्या ते देखील दिल्लीकडं रवाना होण्याची चिन्हं आहेत.
यापूर्वीही कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिलेले सिद्धरामय्या हे जनतेच्या मनातील नेते असल्याचं सांगितलं जातं तर डीके शिवकुमार हे पक्षातील वजन असलेले नेते मानले जातात. त्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी या दोघांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पण शेवटी आमदारांनी ठरवलेल्या त्या अहवालातील नावावरच शिक्कामोर्तब होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.