"थिएटरमध्ये दाखवायचे ब्लू फिल्म"; कुमारस्वामींच्या आरोपावर शिवकुमार काय म्हणाले?

karnataka
karnataka
Updated on

karnataka: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात अश्लील चित्रपट दाखवण्यावरून वाद सुरू झाला आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार यांच्यावर अश्लील चित्रपट दाखवल्याचा आरोप केला होता.  यावर डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डीके शिवकुमार यांनी एचडी कुमारस्वामी यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. शिवकुमार जेव्हा सिनेमागृह चालवत होते तेव्हा ते त्यात अश्लील चित्रपट दाखवायचे, असा आरोप एचडी कुमारस्वामी यांनी केला होता.

यावर शिवकुमार म्हणाले की, कुमारस्वामी यांनी माझ्या मतदारसंघात कनकपुराला भेट द्यावी आणि अशा कोणत्याही कामात माझा सहभाग होता का? याबाबत लोकांची विचारपूस करावी. ते निराश व्यक्ती आहेत. त्यांची मला किव येते. (Latest Marathi News)

"थिएटर इंदिराजींच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले होते. थिएटर माझ्या नावावर (मालकीचे) आहे. मी व्यवसाय चालवण्याबरोबरच थिएटरही चालवत होतो", असे शिवकुमार यांनी म्हटले आहे.

karnataka
Kartiki Ekadashi 2023: विठ्ठलपूजेचा तिढा सुटला...; सरकारकडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य

यावर शिवकुमार म्हणाले, "मला एचडी कुमारस्वामी यांच्याबद्दल वाईट वाटते. ते माजी मुख्यमंत्री राहिले आहेत आणि इतके ज्येष्ठ नेते आहेत, तरीही ते असे बोलत आहेत. त्यांनी माझ्या मतदारसंघात जाऊन तिथल्या जनतेला विचारू दे की त्यांनी मला अश्लील चित्रपट दाखवून इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे का?" (Karnataka Latest News)

"मी अशी बेकायदेशीर कामे केल्याचे त्यांनी (कुमारस्वामी) किंवा अन्य कोणी सिद्ध केले तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. कुमारस्वामी यांनी असे बोलणे अत्यंत लज्जास्पद आहे," शिवकुमार म्हणाले.

karnataka
Mumbai News : मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली?, 'हे' आहे कारण; CM म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.