बंगळुरू - कर्नाटकातील मणिपाल विद्यापीठातील एका शिक्षकाला वर्गात एका मुस्लिम विद्यार्थ्याला 'दहशतवादी' म्हटल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. यावर कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, शिक्षकाने असे बोलू नये आणि या विषयावर राजकारण करू नये. मुळात हा चर्चेचा मुद्दा तरी आहे का? पण कसाबचे नाव समोर येताच मुद्दा का बनला? याचा अर्थ यावर आता राजकारण केलं जाईल, असंही नागेश यांनी म्हटलं. ( Karnataka Student called Terrorist news in Marathi)
विधानसभेत अनेक वेळा रावण-शकुनीसारखी नावं वापरली जातात. मात्र विद्यार्थ्याला अतिरेकी बोलण्याचं विधान केवळ व्होट बँकेसाठीचा मुद्दा बनवला जातोय, असंही शिक्षणमंत्री नागेश यांनी म्हटलं.
ही घटना शुक्रवारी घडली, त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी म्हणतोय, "सर, तुम्ही मला दहशतवादी म्हणू शकत नाही. हा काही विनोद नाही. "तुम्ही तुमच्या मुलाशी असचं बोलाल का, असंही विद्यार्थ्याने विचारलं. प्राध्यापकाने विद्यार्थ्याला त्याचं नाव विचारलं होत. त्यावर मुलाने आपलं मुस्लीम नाव सांगितल्यानंतर शिक्षक म्हणाले 'ओह! तू कसाबसारखा आहेस'. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
२६/११च्या मुंबई हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, विद्यार्थी प्राध्यापकाचा सामना करताना आणि दहशतवाद्याशी तुलना करून आपल्या धर्माची बदनामी केल्याचा आरोप करताना ऐकू येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.