गुब्बी (कर्नाटक) : भाजप सरकारने मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण (Muslim Reservation) संपुष्टात आणले आणि वोक्कलिंग, लिंगायत व एससी, एसटींचा कोटा वाढवला, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले. गुब्बी येथे भाजपच्या वतीने सोमवारी (ता. 1) रोड शो करण्यात आला. यात शहा सामील झाले होते. या शोनंतर अमित शहा यांनी लोकांशी संवाद साधला.
या वेळी अमित शहा म्हणाले, की 'माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकसाठी खूप मोठे काम करून ठेवले आहे. भाजपने (BJP) मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण संपुष्टात आणले; तर वोक्कलिंग, लिंगायत, एससी, एसटींचा कोटा वाढवला. जर काँग्रेस (Congress) सत्तेत आली तर ते हा कोटा कमी करतील आणि मुस्लिमांचे चार टक्के आरक्षण पुन्हा लागू करतील.'
तुम्हाला मुस्लिमांचे आरक्षण पुन्हा लागू केलेले चालणार आहे का? असा प्रश्नही शहा त्यांनी विचारला. कर्नाटकमध्ये डबल इंजिनचे सरकार निवडून द्या, असे आवाहनही शहा यांनी केले. जर कर्नाटकमध्ये भाजप निवडून आला, तर मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, असेही शहा यांनी सांगितले. दरम्यान, तुमकूर येथील खासदार जी. एस. बसवराज हेही शहा यांच्यासोबत या रोड शोमध्ये सामील झाले होते.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी तुमकूरला भेट देऊन कुनिगल मतदारसंघात भाजपचे उमेदवार डी. कृष्णकुमार, तुमकूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार बी. सुरेश गौडा यांना मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनीही तुमकूर जिल्ह्यात मधुगिरी, पावगड आणि कोरटगेरे या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.