थिमय्या हे चिक्कमंगळुरू मतदारसंघातील लिंगायत समाजाचे नेते आहेत.
चिक्कमंगळुरु : कर्नाटक विधानसभेची निवडणूक (Karnataka Assembly Election) जशी जवळ येत आहे, तसे बडे नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी (CT Ravi) यांना घरातच मोठा धक्का बसलाय.
चिक्कमंगळुरूमधील (Chikkamagaluru) लिंगायत नेते (Lingayat), माजी मुख्यमंत्री बीएस यडियुरप्पा (BS Yadiyurappa) यांचे सहकारी आणि भाजपचे समन्वयक एचडी थिमय्या (HD Thimayya) यांनी भाजपला अलविदा करत अधिकृतपणे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला.
आज (19 फेब्रुवारी) बेंगळुरू येथील केपीसीसी कार्यालयात (KPCC Office) एचडी थिमय्या यांनी केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. थिमय्या हे चिक्कमंगळुरू मतदारसंघातील लिंगायत समाजाचे नेते आहेत.
थिमय्यांच्या प्रवेशामुळं काँग्रेसचं पारड जड झालं असून या मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चिक्कमंगळुरुमध्ये 15 हजार वोक्कलिगा आणि 40 हजारांहून अधिक लिंगायत समाजाची मतं आहेत. मात्र, आता थिमय्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळं भाजपची लिंगायत मतं फुटण्याची शक्यता आहे.
सीटी रवी हे गेल्या 20 वर्षात कफिनाड चिक्कमंगळुरुचे 4 वेळा आमदार राहिले आहेत. मात्र, आता त्यांच्याच पक्षाचे माजी नेते विरोधक झाले आहेत. एच.डी थिमय्यांनी यंदा भाजप जिल्हाध्यक्षांकडं तिकीट देण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी तिकीट देण्यास नाकार दिला, त्यामुळं त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा मार्ग पत्करला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.