काँग्रेस सिद्धरामय्या यांना दोन जागांवर उभं करू इच्छित नाहीये. काँग्रेसला प्रत्येक जागा महत्त्वाची आणि प्रत्येक कार्यकर्ता समान असल्याचं दाखवायचं आहे, असं यामागचं कारण आहे.
Karnataka Assembly Election 2023 : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना पक्ष धक्का देण्याची शक्यता आहे. कारण, पक्ष त्यांना कोलार मतदारसंघातून तिकीट देण्याच्या मनस्थितीत नसल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.
आज (गुरुवार) जाहीर झालेल्या 42 नावांच्या दुसऱ्या यादीत कोलारबाबत (Kolar Constituency) निर्णय झालेला नाहीये.
विशेष म्हणजे, सिद्धरामय्या अनेक दिवसांपासून कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. पक्षानं त्यांना वरुणा मतदारसंघातून (Varuna Constituency) निवडणूक लढवण्यास सांगितलंय.
एका मीडिया रिपोर्टमध्ये काँग्रेस (Congress) सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात आलंय की, काँग्रेस सिद्धरामय्या यांना दोन जागांवर उभं करू इच्छित नाहीये.
काँग्रेसला प्रत्येक जागा महत्त्वाची आणि प्रत्येक कार्यकर्ता समान असल्याचं दाखवायचं आहे, असं यामागचं कारण आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान त्यांनी दावा केला होता की, 'मी कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे.'
यासोबतच, त्यांच्या समर्थकांनी परिसराचा सर्व्हे केला असून या जागेवर सिद्धरामय्या यांचा विजय निश्चित असल्याचंही बोललं जात आहे.
याशिवाय, राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून ते आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे.
एका मुलाखतीदरम्यान सिद्धरामय्या म्हणाले होते, 'कोलार, चिकबल्लापूर आणि बेंगळुरू ग्रामीणमधील काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मला कोलार मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली आहे.
त्यांना वाटतं की, मी कोलारमधून लढलो तर कोलार जवळच्या 20 हून अधिक जागांना मदत होईल. अशा स्थितीत कोलारमधून लढण्यासाठी माझी मानसिक तयारी आहे.'
'पण, मी एक किंवा दोन जागेवरून निवडणूक लढवायची की नाही याचा अंतिम निर्णय हायकमांडला घ्यायचा आहे.
मी कोलारच्या जनतेला सांगितलंय की, जर हायकमांड सहमत असेल तर मी कोलारमध्येही लढेन. कारण, त्यांनी वरुणा मतदारसंघाला आधीच मान्यता दिलीये.'
काँग्रेसचे आणखी एक नेते डॉ. जी परमेश्वर यांनीही दोन जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
यानंतर हायकमांडनं सिद्धरामय्या यांना अन्य कोणत्याही जागेवरून उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. सिद्धरामय्या यांना दोन जागांवर उमेदवारी का दिली जात आहे? असा सवाल परमेश्वर यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.