काश्मीर खोऱ्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणून कुरापती करणाऱ्यांना सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून धडा शिकविला आहे.
बेळगाव : कर्नाटकात काँग्रेसची (Congress) सत्ता येणार नाही. मात्र, सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत. बजरंग दलावर (Bajrang Dal) बंदी घालणं कोणालाही शक्य नाही, असं स्पष्ट मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलं.
प्रभू श्रीराम आणि बजरंग बली यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा येत्या निवडणुकीत दाखवून द्या. विकासासाठी भाजपला एकहाती सत्ता द्या, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार (BJP Candidate) डॉ. रवी पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (ता. 4) टिळक चौकात झालेल्या जाहीर सभेत फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके, उपमहापौर रेश्मा पाटील होत्या.
फडणवीस म्हणाले, ‘‘भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे देशात आणि कर्नाटकात विकासाचा आलेख उंचावला आहे. देशाची अर्थव्यवस्था ११ वरुन पाचव्या स्थानी पोचली. घरकुल योजना, शौचालये, शुद्ध पाणी, वीजजोडण्या दिल्या आहेत. देशाचे बजेट ४८ लाख कोटींवर पोचविले आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणून कुरापती करणाऱ्यांना सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करून धडा शिकविला आहे.’’
कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी, सिध्दरामय्या यांचे सर्कस सरकार पाहिले आहे. त्यामुळे आता काँग्रेस सत्तेवर येणार नाही. मात्र, सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार, एम. बी. पाटील आणि खर्गे हे मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यास ती अस्थिर असेल. काँग्रेसने राम काल्पनिक पात्र असल्याचा दावा केला आहे.
रामसेतू तोडण्यास आक्षेप नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले होते. मात्र, श्रीराम, बजरंग बली, हिंदुत्वसोबत हिंदू संस्कृती आपली ओळख आहे. ती पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले. यावेळी बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर, शंकरगौडा पाटील, दादागौडा पाटील, योगेंद्र पाटील, विजय कोडगनूर, नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती आदींसह भाजपचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.