Karnataka Election 2023: मोदींना विषारी साप संबोधणाऱ्या खर्गेंचा यूटर्न; म्हणाले, राजकीय मर्यादा...

खर्गेंच्या वादग्रस्त विधानावर भाजपनं त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
Mallikarjun Kharge vs Narendra Modi
Mallikarjun Kharge vs Narendra Modiesakal
Updated on

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषारी साप असं संबोधल्यानं त्यांना मोठ्या टिकेला समोर जावं लागलं. भाजप तर पत्रकार परिषद घेत त्यांच्या या विधानाचा समाचार घेतला. मोठा वाद निर्माण झाल्यानं अखेर खर्गेंनी दिलगिरी व्यक्त करत आपल्या विधानावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. (Karnataka Election 2023 Mallikarjun Kharge who called PM Modi a poisonous snake takes U turn)

खर्गेंनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटलं की, भाजपची विचारधारा विभाजनकारी, वैमनस्यपूर्ण तसेच गरीब आणि दलितांप्रती द्वेष आणि पूर्वग्रह दुषित आहे. मी याच द्वेषाच्या राजकारणाची चर्चा केली. माझं विधान व्यक्तिगतरित्या पंतप्रधानांसाठी किंवा इतर कुठल्याही व्यक्तीसाठी नव्हतं. मी गरीब आणि दलितांचं दुःख पाहिलं असून सोसलंही आहे. पाच दशकांपासून भाजप तसेच आरएसएसच्या विभाजनकारी विचारधारेला, त्यांच्या नेत्यांना माझा कायमच विरोध राहिला आहे.

माझी राजकीय लढाई त्यांच्या राजकारणाविरोधात होती आणि कायम राहिलं. तसेच माझ्या दीर्घ राजकीय जीवनातील आचरणंच कायम मित्र आणि विरोधकांप्रती राजकीय मर्यादा आणि परंपरा निभावणारं राहिलं आहे. याचं जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत मी पालन करेन. बड्या पदांवर बसलेल्या लोकांचा आणि त्यांच्या त्रासाची मी खिल्ली उडवत नाही, परंतू ते ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात त्या विचारधारेसाठी होतं. पंतप्रधान मोदींशी आमची वैयक्तीक लढाई नाही, वैचारिक लढाई आहे.

माझा हेतू कोणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. पण जर कळत नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर माझी ही भावना कदापी नव्हती, असं खर्गे यांनी अनेक ट्विटद्वारे म्हटलं आहे.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विषारी सापाची उपमा; काँग्रेस अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

खर्गेंनी काय केलं होतं विधान?

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कलबुर्गी इथं एका सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधानांबद्दल अनुद्गार काढले. सुरुवातीला त्यांनी पंतप्रधानांना चांगली व्यक्ती असं संभोधलं नंतर त्यांची भाषा घसरत गेली. त्यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी हे विषारी सापाप्रमाणं आहेत. तुम्ही विचार करु शकता की ते विषारी आहेत की नाही. जर तुम्ही त्यांच्या संपर्कात याल तर तुमचा जीव जाईल.

Mallikarjun Kharge vs Narendra Modi
Mallikarjun kharge on PM Narendra Modi : मल्लिकार्जुन खर्गे यांचा नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल

भाजपनं चढवला जोरदार हल्ला

खर्गेंच्या या वादग्रस्त विधानानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला. त्यांनी म्हटलं की, काँग्रेस पक्षाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. पंतप्रधानांबाबत त्यांची भाषा दिवसेंदिवस अभद्र होत चालली आहे. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खर्गेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले, खर्गेंना कोणीही काँग्रेसचं अध्यक्ष मानत नाही. त्यामुळंच त्यांनी हे विधान करण्याची हिम्मत केली, त्यांचं विधान हे सोनिया गांधी यांनी केलेल्या विधानापेक्षा खालच्या पातळीवरच होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.