Karnataka Election : बापाला भाजपकडून तिकीट मिळाल्यानं पोराचा आनंद गगनात मावेना; थेट हवेत केला गोळीबार

भाजपनं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा घणाघाती आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संगमेश बबलेश्वर यांनी केला.
Karnataka election Babaleshwar BJP candidate
Karnataka election Babaleshwar BJP candidateesakal
Updated on
Summary

वडील विजूगौडा पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा समर्थ गौडा याने पिस्तुलातून हवेत तीन राउंड गोळ झाडून विचित्र पद्धतीनं आनंद साजरा केला होता.

बंगळूर : विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर मतदारसंघातील (Bableswar Constituency) भाजपचे उमेदवार (BJP Candidate) विजूगौडा पाटील यांचा मुलगा समर्थ गौडा यानं पिस्तुलातून हवेत तीन राउंड गोळीबार करत आनंदोत्सव करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधी काँग्रेसनं (Congress) भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे.

Karnataka election Babaleshwar BJP candidate
Mahad : राजकारणात मोठी उलथापालथ; काँग्रेसला धक्का देत माजी आमदाराची कन्या करणार ठाकरे गटात प्रवेश

भाजपनं गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा घणाघाती आरोप कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संगमेश बबलेश्वर यांनी केला. वडील विजूगौडा पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा मुलगा समर्थ गौडा याने पिस्तुलातून हवेत तीन राउंड गोळ झाडून विचित्र पद्धतीनं आनंद साजरा केला होता. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे, असा दावा संगमेश यांनी केला.

Karnataka election Babaleshwar BJP candidate
Karnataka : निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठा धक्का; 'या' उमेदवारावर चोरीचा आरोप सिद्ध, PM मोदींची तात्काळ सभा रद्द

संगमेश बबलेश्वर यांनी भाजप नेत्यांना कोणत्या आधारावर उमेदवारी दिली, असा सवालही केला. हा व्हिडिओ संगमेश आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू अलगुरु यांनी विजापूर इथं जारी केला. त्यांनी मीडिया कॉन्फरन्स बोलावून गोळीबाराचा व्हिडिओ दाखवला. बबलेश्वर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराकडून दादागिरी सुरू आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि इतर नेत्यांनी त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.