शशिकला जोल्ले यांच्या विजयाची आम्हाला खात्री होती, मतमोजणीतून विजय सिध्द झाला आहे. मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत.
निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघातील (Nipani Assembly Constituency) जनतेने तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवून माझी हॅट्ट्रिक घडवून आणली. भविष्यात मतदारसंघातील जनतेचा विश्वास सार्थकी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले (Shashikala Jolle) यांनी केले.
शनिवारी (ता. १३) विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन सायंकाळी निपाणीत दाखल झाल्यावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आमदार जोल्ले यांचे जल्लोषी स्वागत केले.
बेळगावनाका येथे आमदार जोल्ले यांच्या स्वागतासाठी मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. सायंकाळी आमदार जोल्ले यांचे जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली. राणी चन्नम्माचौकात आल्यावर मंत्री जोल्ले यांचा नागरी सत्कार झाला.
यावेळी मंत्री जोल्ले म्हणाल्या, यावेळची विधानसभा निवडणूक जनतेने हाती घेतली होती. केलेल्या विकासकामावर प्रभावीत होऊन जनतेने कामाची माहिती घरोघरी पोचवली. जनतेने विकासकामाला स्वीकारले असून विरोधकांना पराभूत केले आहे. निपाणीतील मतदारांचे ऋण विसरणार नाही, यापुढेही गप्प राहणार नाही, विकासकामे सुरुच राहतील.
खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, शशिकला जोल्ले यांच्या विजयाची आम्हाला खात्री होती, मतमोजणीतून विजय सिध्द झाला आहे. मतदार संघात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. यापुढेही जनसेवेसाठी सज्ज आहोत. यावेळी हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, ज्योतीप्रसाद जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, अप्पासाहेब जोल्ले, पप्पू पाटील, जयवंत भाटले, निता बागडे, सुनील पाटील, प्रणव मानवी, दिलीप चव्हाण, प्रा. विभावरी खांडके, पवन पाटील, राजू गुंदेशा, समीत सासणे, प्रकाश शिंदे, अभय मानवी, मनोहर मगदूम, मधुकर पाटील, अविनाश पाटील, प्रसाद औंधकर यांच्यासह नगरसेवक, हालशुगरचे संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.