Karnataka Result : बंडखोरीमुळं काँग्रेसनं गमावल्या 'इतक्या' जागा; फेरमतमोजणीत उमेदवाराचा 16 मतांनी पराभव

फेरमतमोजणीत काँग्रेस (Congress) उमेदवाराचा अवघ्या १६ मतांनी पराभव झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023esakal
Updated on
Summary

बंडखोरी होऊन मतांची विभागणी झाल्यामुळं निपाणी आणि रायबागला (Raibag) काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे.

बेळगाव : जयनगर येथील विधानसभा मतदारसंघात झालेल्या फेरमतमोजणीत काँग्रेस (Congress) उमेदवाराचा अवघ्या १६ मतांनी पराभव झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मात्र, जिल्ह्यात बंडखोरीमुळे काँग्रेसच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. मतविभागणीचा फायदा भाजपला झाल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जयनगरला पहिल्यांदा रेड्डी यांचा ३६० मतांनी विजय झाल्याचे घोषित झाले. मात्र, येथे झालेल्या फेरमतमोजणीत १६ मतांनी त्यांचा पराभव झाल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे १३६ जागा काँग्रेसला मिळाल्याची घोषणा केली होती. नंतर १३५ जागांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली. यामुळं पक्षाला एकहाती सत्ता मिळाली असली तरी यात आणखी दोन जागा बेळगाव जिल्ह्यामधून (Belgaum District) पक्षाला मिळाल्या असत्या, अशी चर्चा वर्तुळात आहे.

बंडखोरी होऊन मतांची विभागणी झाल्यामुळं निपाणी आणि रायबागला (Raibag) काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. तिरंगी लढतीचा फटका बसला आणि काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार शशिकला जोल्ले विजयी झाल्या. त्यांना ७७,९५२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम पाटील यांना ६६, ६१४, तर काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांना ४३,९३२ मते पडली. त्यामुळे जोल्ले यांनी ११ हजार ३३८ इतक्या मताधिक्यांनी विजय मिळविला.

Karnataka Election Result 2023
Dhananjay Mahadik : महाडिकांचा प्रचार केला म्हणून भाजपच्या 16 जणांवर कारवाई; 'त्यांचं' भवितव्य धोक्यात!

मुळात उत्तम पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, पक्षाने काकासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली. बंडखोरीमुळे मतविभागणी झाली. बंडखोरी थोपविता आली असती तर काँग्रेसला सहज विजय मिळविणे शक्य होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Karnataka Election Result 2023
Hasan Mushrif : 'मेव्हण्या-पाव्हण्यांशी माझी 40 वर्षांपासूनची मैत्री, त्यांच्याबाबत लवकरच निर्णय घेऊ'

रायबागला आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी २,६३१ मताधिक्यांनी विजय मिळविला आहे. ऐहोळे यांना ५७, १६४ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळकर यांनी ५४,५३३ मते घेतली. काँग्रेस उमेदवार महावीर मोहिते यांना २२,५५० मते मिळाली. कल्लोळकर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी देण्याची मागणी केली होती, पण पक्षाने मोहिते यांना उमेदवारी दिली.

Karnataka Election Result 2023
Maharashtra Politics : आमच्या घराण्यात विश्‍वासघात करण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा शरद पवारांवर थेट वार

याठिकाणी उमेदवारीत बदल किंवा बंडखोरी थोपवून कल्लोळकर यांचा पाठिंबा मिळविला असता तर काँग्रेस येथून झेंडा फडकवू शकला असता, अशी चर्चा कार्यकर्त्यांत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची लाट होती. निपाणी, रायबागलाही तसे संकेत मिळत होते. मात्र, पक्षीय पातळीवर त्याचा कानोसा घेऊन योग्य उमेदवार निवडणे शक्य झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.