Karnataka Election Result: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या एकतर्फी विजयानंतर रविवारी (१४ मे) सायंकाळी ५.३० वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यामध्ये राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर आमदार शिक्का करण्याची शक्यता आहे. तर आज विधानसभा गटनेत्याची निवड होणार आहे.
काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची लढाई तीव्र झाली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी डी.के शिवकुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या समर्थनार्थ कर्नाटकात पोस्टर बाजी करण्यात येत आहे.
डी.के शिवकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या बेंगळुरू येथील घराबाहेर पोस्टर लावले आहेत. यामध्ये शिवकुमार यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शनिवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालात काँग्रेसने १३५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. २२४ सदस्यीय विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी ११३ सदस्यांची गरज आहे.
सिद्धरामय्या यांच्या समर्थकांमध्ये उत्साह
डी.के शिवकुमारच नाही तर सिद्धरामय्या यांच्या समर्थकांमध्येही देखील उत्साहाचे वातावरण आहे. कर्नाटक राज्यात प्रचंड जनमानस असलेल्या सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये गणना केली जात आहे.
यापूर्वी ते २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर सिद्धरामय्या यांच्या समर्थकांना त्यांच्याकडून मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण होवू शकतो.
निकाल काय लागला?
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी ११३ जागा बहुमताचा आकडा आहे. हा आकडा काँग्रेसनं पार केला असून १३६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपनं ६५ जागा जिंकल्या आहेत. तर जनता दल सेक्युलर या पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष आणि प्रत्येकी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
दरम्यान, पक्षनिहाय मतांची विभागणी पाहिल्यास यामध्ये काँग्रेसला ४२.९८ टक्के, भाजपला ३५.९१ टक्के तर जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.