Karnataka Election Results : कर्नाटकच्या रणधुमाळीत केजरीवालांच्या 'आप'ची स्थिती काय? जाणून घ्या

कर्नाटक निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसनं (Congress) बहुमताचा आकडा पार केलाय.
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal
Updated on
Summary

2018 मध्ये AAP नं कर्नाटकात 28 जागा लढवल्या, पण इथं छाप पाडण्यात अपयश आलं. कर्नाटकात पक्षाला केवळ 0.06 टक्के मतं मिळाली.

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसनं (Congress) बहुमताचा आकडा पार केलाय. त्याचवेळी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आणि जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केलेल्या अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षानं कर्नाटक या रणांगणातही आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र, आम आदमी पक्षाला (Aam Aadmi Party) अपेक्षेनुसार यश मिळताना दिसत नाहीये.

Arvind Kejriwal
Karnataka Election Result : कर्नाटकातील पहिला निकाल हाती; काँग्रेस उमेदवारानं 16 हजार मतांनी मारली बाजी

मतमोजणीत आम आदमी पक्षाच्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल बोलायचं झालं, तर कर्नाटकच्या जनतेनं त्यांना पूर्णपणे नाकारलं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत आम आदमी पक्षाला 0.56 टक्के मतं मिळाली आहेत. दुसरीकडं मतांचा विचार करता त्यांना आतापर्यंत 45201 मतं मिळाली आहेत.

2018 मध्ये AAP नं कर्नाटकात 28 जागा लढवल्या, पण इथं छाप पाडण्यात अपयश आलं. कर्नाटकात पक्षाला केवळ 0.06 टक्के मतं मिळाली. दरम्यान, कर्नाटक विधानसभेतील एकूण 224 मतदारसंघांपैकी 209 जागांवर पक्षानं उमेदवार उभे केले आहेत. यातील 15 जागांवर पक्षानं चुरशीची लढत देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळाल्यानंतर कर्नाटकातही आम आदमी पक्षाला यशाची अपेक्षा आहे. मात्र, इथं त्यांना अपयश आलं आहे.

Arvind Kejriwal
Karnataka Election Result : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछाडी; बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.