Karnataka Result : कर्नाटकात बड्या नेत्यांचा पराभव, प्रमुख नेत्यांनी मारली बाजी; जाणून घ्या कोण विजयी, कोण पराभूत?

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्नाटक पिंजून काढलेल्या काँग्रेसला मतदारांनी अभूतपूर्व कौल दिलाय.
Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result 2023esakal
Updated on
Summary

काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे.

Karnataka Election Result 2023 : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्नाटक पिंजून काढलेल्या काँग्रेसला मतदारांनी अभूतपूर्व कौल दिलाय. काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर, काँग्रेस 134 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, भाजपकडून (BJP) आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास पाहता काँग्रेसकडून अत्यंत काळजीपूर्व पावले उचलली आहेत.

Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result : कर्नाटकात पराभव झाला तरी 'हा' विजय भाजपला सुखावणारा असेल!

या निवडणुकीत मोठ-मोठ्या नेत्यांचा पराभव झाला आहे. तर, प्रमुख नेते विजयी झाले आहेत. निवडणुकीत डी. के. शिवकुमार तब्बल एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. वरुणामधून सिध्दरामय्या यांनी विजय संपादन केला आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी, चलगिरा मतदार संघातून काॅंग्रेसचे उमेदवार टी. रघुमूर्ती विजयी झाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव झाला आहे. तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची अजंली निंबाळकर यांचा देखील पराभव झाला आहे.

Karnataka Election Result 2023
Karnataka Election Result : कर्नाटकात भाजपचा सुपडासाफ; 'ही' आठवण काढत डीकेंना कोसळलं रडू

बेळगाव मतदारसंघातील विजयी उमेदवार

  • दक्षिण - अभय पाटील- बीजेपी

  • खानापूर - विठ्ठल हलगेकर- बीजेपी

  • निपाणी - शशिकला जोल्ले - भाजप

  • गोकाक - रमेश जारकिहोळी- भाजप

  • आरभावी - भालचंद्र जारकिहोळी - भाजप

  • हुक्केरी - निखिल कती - भाजप

  • अथणी - लक्ष्मण सवदी - काँग्रेस (भाजप बंडखोर)

  • कागवड - भरमगौड कागे- काँग्रेस

  • कित्तुर - बाबासाहेब पाटील - काँग्रेस

  • बैलहोंगल - महानतेश कौझलगे - काँग्रेस

  • कुडची - महेंद्र तमन्नावर- काँग्रेस

  • सौदत्ती - विश्वास वैद्य- काँग्रेस

  • रामदुर्ग - अशोक पट्टण- काँग्रेस

  • यमकनगर्डी - सतीश जारकीहोळ- काँग्रेस

  • चिकोडी - गणेश हुक्केरी - काँग्रेस

  • ग्रामीण - लक्ष्मी हेब्बाळकर - काँग्रेस

  • उत्तर - राजू शेठ - काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()