Muslim Reservation : निवडणुकीच्या तोंडावर मुस्लिम आरक्षणाबाबत कर्नाटकनं सुप्रीम कोर्टाकडं मागितला 'वेळ'

मुस्लिमांचं आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आक्षेप घेत असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत.
Muslim Reservation
Muslim Reservationesakal
Updated on
Summary

मुस्लिमांचं आरक्षण रद्द करुन लिंगायत आणि वोक्कलिंगा समाजाला लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

नवी दिल्ली : कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मुस्लिम आरक्षणावरुन (Muslim Reservation) कर्नाटकात गदारोळ सुरु आहे.

दरम्यान, मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण रद्द करण्यासंदर्भातील प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) सर्वोच्च न्यायालयाकडं वेळ मागितला आहे.

Muslim Reservation
Karnataka Election Survey : निवडणुकीपूर्वी मोठा सर्व्हे समोर; जाणून घ्या कोणाचं बनतंय सरकार, भाजप की काँग्रेस?

कर्नाटकच्या या विनंतीची दखल घेत न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठानं सदर प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिल पर्यंत तहकूब केलीये. मुस्लिमांचं आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आक्षेप घेत असंख्य याचिका दाखल झालेल्या आहेत. यावर सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) कर्नाटक सरकारला उत्तर सादर करण्यास सांगितलंय.

Muslim Reservation
Yogi Adityanath : अतिक-अशरफच्या हत्येनंतर CM योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हे कायद्याचं राज्य..

मुस्लिमांचं आरक्षण रद्द करुन लिंगायत आणि वोक्कलिंगा समाजाला लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 25 एप्रिलपर्यंत केली जाणार नाही, असं कर्नाटक सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. या प्रकरणात काही याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करीत आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधूमीत हा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.