Education News : शाळा सोडणाऱ्या विद्यार्थी संख्येत कर्नाटक सातव्या क्रमांकावर; पाच वर्षांत 53 हजार मुलांची गळती

पाऊस न झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे.
Karnataka Schools
Karnataka Schoolsesakal
Updated on
Summary

मुले शाळा सोडण्याची अनेक कारणे आहेत. कोविड हे देखील या समस्येचे एक कारण आहे. अत्यंत गरिबी हे त्यातील एक आहे.

बंगळूर : शाळा (School) सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कर्नाटक (Karnataka) देशात सातव्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षांत ५३ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी विविध कारणांमुळे शाळेचा निरोप घेतला आहे.

२०१७-१८ मध्ये नऊ हजार ३६२ मुले, २०१८-१९ मध्ये सहा हजार ८०६, २०१९-२० मध्ये १७ हजार ५२, २०२०-२१ मध्ये सात हजार, २०२१-२२ मध्ये १३ हजार २६२ मुले शाळाबाह्य आहेत. मुले शाळा सोडण्याची अनेक कारणे आहेत. कोविड हे देखील या समस्येचे एक कारण आहे. अत्यंत गरिबी हे त्यातील एक आहे.

Karnataka Schools
..अखेर कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेवर DGCA कडून शिक्कामोर्तब; आता प्रतिकूल परिस्थितीतही झेपावणार विमान

पाऊस न झाल्याने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. विशेषतः उत्तर कर्नाटकातील नागरिक कामाच्या शोधात स्थलांतर करत आहेत. बंगळूर, म्हैसूर, मंगळूर, शिमोगा, गोवा, कारवार यांसारख्या शहरात जात असताना अनेकजण आपल्या मुलांना सोबत घेऊन जातात. अशा प्रकारे, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली तरी ते ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी सरकारी शाळेत प्रवेश घेतीलच याची शाश्वती नसते.

Karnataka Schools
'अरेबियन सी हम्पबॅक व्हेल'चा हर्णे बंदरात हॉटस्पॉट; 400 मच्छीमारांच्या मुलाखतीनंतर संशोधकांचं शिक्कामोर्तब

नियंत्रणासाठी उपाययोजना

कर्नाटक मोफत आणि सक्तीचे शिक्षण ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही मूल शाळा सोडू नये, यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली. आंतरविभागीय समन्वय समितीच्या बैठका वेळोवेळी घेतल्या जात आहेत. शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संनियंत्रण केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.