BS Yediyurappa: येडीयुरप्पांना दिलासा! POCSO अंतर्गत होणारी अटक तुर्तास टळली; हायकोर्टानं काय म्हटलंय वाचा?

येडीयुरप्पांविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी विशेष कोर्टानं अजामिनपात्र अटक वॉरंट काढलं होतं.
BS Yediyurappa
BS Yediyurappaesakal

नवी दिल्ली : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी गुरुवारी विशेष कोर्टानं अजामिनपात्र अटक वॉरंट काढलं होतं. त्यामुळं येडीयुरप्पांच्या अडचणी वाढल्या होत्या. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती.

पण या आदेशाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टानं त्यांना दिलासा दिला आणि पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई करु नये असे निर्देश पोलिसांना दिले. (Karnataka HC directs CID to not arrest ex CM Yediyurappa in POCSO case until next hearing)

कर्नाटक हायकोर्टानं निरीक्षण नोंदवताना म्हटलं की, येडियुरप्पा हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत जे त्यांच्या आयुष्याच्या उतरंडीला आले आहेत आणि सध्या आजारी देखील आहेत. पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात येऊ नये.

याच वर्षी मार्चमध्ये येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. हा खटला रद्द करावा यासाठी येडियुरप्पा यांनी बुधवारी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. विशेष कोर्टानं गुरुवारी येडियुरप्पा यांच्यासाठी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com