Karnataka HC : 'बायकोला सांभाळता, मग आईला का नाही?', हायकोर्टाने दोन भावांना सुनावलं

या भावांची याचिका रद्द करत, कोर्टाने त्यांना ५ हजार रुपये दंडही ठोठावला.
Karnataka HC
Karnataka HCeSakal
Updated on

आपल्या वृद्ध आईची काळजी न घेणाऱ्या दोन भावांना कर्नाटक उच्च न्यायालयाने चांगलंच सुनावलं. जर तुम्ही आपल्या पत्नीचं पालनपोषण करू शकता, तर आईकडे दुर्लक्ष करण्याचं काहीच कारण नाही. आश्रित आईची काळजीही तुम्ही घ्यायलाच हवी, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं.

न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. ८४ वर्षीय वेंटकम्मा यांच्या दोन्ही मुलांना कोर्टाने कानपिचक्या दिल्या. तसेच, वेंकटम्मा यांना प्रत्येकी दरमहा १० हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेशही कोर्टाने दोन्ही भावांना दिले.

Karnataka HC
Karnataka HC Decision : 'पंतप्रधान मोदींवर टीका करणे अपमानास्पद, मात्र देशद्रोह नाही'; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

काय आहे प्रकरण?

८४ वर्षांच्या वेंकटम्मा या आपल्या मुलीकडे राहत आहेत. त्यांना गोपाल आणि महेश अशी दोन मुलं आहेत. मैसूर येथील सहाय्यक आयुक्तांनी वेंकटम्मा यांच्या पालन-पोषणासाठी दोन्ही भावांनी मिळून प्रत्येकी ५-५ हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले होते.

या निर्णयाविरोधात दोन्ही भावांनी उपायुक्तांकडे दाद मागितली होती. तर उपायुक्तांनी त्या दोघांना फटकारून मदतीची रक्कम ५ हजारांवरून प्रत्येकी १० हजार केली होती. यानंतर या निर्णयाविरोधात दोघा भावांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देताना हायकोर्टाने या दोन्ही भावांना फटकारलं.

Karnataka HC
Odisha HC : 'लग्नाचं वचन मोडलं, तरी सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही'; हायकोर्टाचा मोठा निर्णय

दोन्ही भावांनी असा दावा केला होता, की आपण गरीब असल्यामुळे आईला पैसे देऊ शकत नाही. हा दावा चुकीचा असल्याचं कोर्टाने म्हटलं. दोन्ही भाऊ आर्थिकदृष्ट्या स्थिर दिसतात. एक पुरूष ज्याप्रमाणे पत्नीची काळजी घेण्यास बांधील असतो, त्याच प्रमाणे आईचीही काळजी त्याने घेणं अपेक्षित असतं. आजकाल तरुण वर्गामध्ये आई-वडिलांची काळजी न घेण्याचं प्रमाण वाढलं आहे, हे दुर्दैवी असल्याचंही कोर्टाने यावेळी म्हटलं.

५ हजार दंड

दरम्यान, या भावांची याचिका रद्द करत, कोर्टाने त्यांना ५ हजार रुपये दंडही ठोठावला आहे. ३० दिवसांच्या आत त्यांनी दंडाची रक्कम आपल्या आईला द्यावी असे आदेश कोर्टाने दिले. असं न केल्यास, ३० दिवसांनंतर दिवसाला १०० रुपये अतिरिक्त रक्कम त्यात जोडण्यात यावी, असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं.

Karnataka HC
Madras HC : गृहिणी घरात २४ तास करतात काम; पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचाही हक्क! हायकोर्टाचा निर्वाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.