मोठी बातमी! 'अंजुमन'चा अर्ज फेटाळत ईदगाह मैदानावर गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेस High Court ची परवानगी; हिंदुत्ववाद्यांचा आनंद मावेना गगनात

ईदगाह मैदानात गणेशमूर्ती स्थापन करण्यास परवानगी देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे.
Ganesh Chaturthi Idgah Ground
Ganesh Chaturthi Idgah Groundesakal
Updated on
Summary

अंजुमन संघटनेचा अर्ज फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.

बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) धारवाड खंडपीठाने शुक्रवारी (ता. १५) हुबळीतील वादग्रस्त ईदगाह मैदानावर (Idgah Ground) गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) गणेशमूर्ती स्थापन करण्याविरोधात अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

हुबळी-धारवाड महानगरपालिकेने ईदगाह मैदानावर गणेशमूर्ती स्थापन करण्यास परवानगी दिलेल्या ठरावाविरोधात अंजुमन-ए-इस्लामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाली.

Ganesh Chaturthi Idgah Ground
Maratha Community : राज्यभरात विक्रमी 57 मोर्चे निघाले अन् 2016 नंतर बदलला मराठा समाज; पण अद्यापही आरक्षण नाही!

ईदगाह मैदानात गणेशमूर्ती स्थापन करण्यास परवानगी देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. मात्र, नुकताच पदभार स्वीकारलेल्या महानगरपालिका आयुक्तांनी गणेश स्थापन करण्यास परवानगी दिली नाही. आयुक्तांच्या या कारवाईचा भाजपकडून निषेध करण्यात येत आहे.

Ganesh Chaturthi Idgah Ground
Gokul Dudh Sangh : धनंजय महाडिकांच्या सासऱ्याकडे आधी ठेका होता, त्यांनी एवढे दिवस काय केले? 'गोकुळ' अध्यक्ष डोंगळेंचा सवाल

उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी कर्नाटक उच्च न्यायालयाने हुबळीच्या ईदगाह मैदानावर गणेश चतुर्थी साजरी करण्यास परवानगी दिली होती. यावेळीही उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. अंजुमन-ए-इस्लामने दाखल केलेली याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने हे मैदान हुबळी-धारवाड महानगरपालिकेची मालमत्ता आहे आणि ती जागा ज्याला हवी असेल, त्याला देता येते, असे सांगितले.

Ganesh Chaturthi Idgah Ground
Chaitra Kundapur : भाजपकडून तिकीट देण्याचं आमिष दाखवून पाच कोटींची फसवणूक; आरोपी चैत्राचा आत्महत्येचा प्रयत्न?
https://x.com/ANI/status/1702591091659391025?s=20

अंजुमन संघटनेचा अर्ज फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. भाजप आमदार महेश टेंगिनकाई आणि श्री राम सेना प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यासह अनेकांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.