Congress प्रदेशाध्यक्षांना मोठा दिलासा; CBI चौकशीला High Court नं दिली स्थगिती

शिवकुमार यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीला 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलीये.
DK Shivakumar
DK Shivakumaresakal
Updated on
Summary

न्यायमूर्ती के. नटराजन यांनी शिवकुमार यांच्या याचिकेवर अंतरिम आदेश दिला.

बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) राज्य काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना सीबीआय चौकशीतून दोन आठवड्यांची मुदत दिलीये.

उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार, शिवकुमार यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीला 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलीये.

DK Shivakumar
NCP चा 'हा' बडा नेता अडकणार ED च्या जाळ्यात? सोमय्यांनी Video शेअर करुन दिली महत्वाची अपडेट

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये (Congress Government) मंत्री असताना 2013 ते 2018 या कालावधीत 74.93 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शिवकुमार यांच्यावर खटला सुरुये. न्यायमूर्ती के. नटराजन यांनी शिवकुमार यांच्या याचिकेवर अंतरिम आदेश दिला.

DK Shivakumar
PM Modi : पूर्वी एकाच पक्षाला झेंडा फडकवण्याची परवानगी होती, पण आता..; मोदींचा काँग्रेसवर पुन्हा निशाणा

पुढील काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सीबीआयनं नुकतीच ही नोटीस बजावली असल्याचा दावाही शिवकुमारांच्या वकिलानं केला. गेल्या वर्षी जुलैमध्ये शिवकुमार यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 13(2) आणि 13(1)(ई) अंतर्गत ऑक्टोबर 2020 मध्ये सीबीआयनं नोंदवलेल्या एफआयआरच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()