नवी दिल्ली : कर्नाटक हायकोर्टाने आज शुक्रवारी ट्विटर इंडियाचे एणडी मनीष माहेश्वरी यांना दिलासा दिला आहे. माहेश्वरी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्याविरोधात पाठवलेल्या समन्सच्या विरोधात याचिका दाखल केली होती. नोटीसमध्ये त्यांना गाझीयाबादमधील लोनी गावामध्ये एका मारहाणीच्या व्हिडीओ संदर्भात वैयक्तिक रित्या हजर राहण्यास सांगितलं होतं. ही नोटीस दुष्ट प्रवृत्तीने पाठवल्याचंही हायकोर्टाने म्हटलंय.
गाझीयाबादमध्ये एका वयस्कर व्यक्तीला झालेल्या मारहाणीप्रकरणी यूपी पोलिसांनी ट्विटरच्या एमडींना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यानंतर मनीष माहेश्वरी यांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये यासंदर्भात आव्हान दिलं होतं. कोर्टाने यूपी पोलिसांची ही नोटीस रद्दबातल ठरवत म्हटलंय की, पोलिस गरज भासल्यास ट्विटर इंडियाच्या एमडींची व्हर्च्यूअल पद्धतीने चौकशी करु शकतात आणि त्यांचं वक्तव्य रेकॉर्ड करु शकतात.
उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये एका मुस्लिम वयस्कर व्यक्तीच्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यासंदर्भात वेगवेगळे दावे केले गेले होते. अनेकांनी या मारहाणीच्या व्हिडीओमागे धार्मिक कारण असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली होती. पोलिसांचं म्हणणं आहे की, या संपूर्ण प्रकरणाला जाणीवपूर्वक धार्मिक रंग देण्याचं काम केलं गेलं. या संपूर्ण प्रकरणात ट्विटरवर यासाठी कारवाई झाली कारण ट्विटवरने या घटनेसंदर्भातील व्हिडीओ डीलीट केले नाहीत, अथवा त्या व्हिडीओखाली कसलेही टॅग लावले नाहीत. त्यामुळेच यूपी पोलिसांनी खटला दाखल करत ट्विट इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. हा सर्व घटनाक्रम सुरु असतानाच केंद्र सरकार आणि ट्विटर कंपनी दरम्यान धुसफूस सुरु होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.