CM Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मोठा दिलासा! High Court नं 'या' खटल्याला दिली स्थगिती, भाजपच्या मनसुब्यावर पाणी

आता उच्च न्यायालयाने सिद्धरामय्या यांच्या विरोधात स्थगिती आदेश जारी केला आहे.
DK Shivakumar Siddaramaiah
DK Shivakumar Siddaramaiahesakal
Updated on
Summary

काँग्रेस नेत्यांवर हायग्राऊंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बंगळूर : मागील भाजप सरकारच्या (BJP Government) विरोधात आंदोलनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याला उच्च न्यायालयाने (High Court) स्थगिती दिली आहे.

DK Shivakumar Siddaramaiah
Maratha Reservation चा तिढा सुटणार? जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं?

बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणातील पहिले आरोपी भाजपनेते, माजी मंत्री ईश्वराप्पा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी यासाठी काँग्रेसने निदर्शने केली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या सिद्धरामय्या यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

DK Shivakumar Siddaramaiah
भाजपचं टेन्शन वाढवणारी बातमी! राज्यात 'ऑपरेशन हस्त'ला वेग, बड्या नेत्याची पडद्यामागं रणनीती, BJP आमदार फुटणार?

या संदर्भात काँग्रेस नेत्यांवर हायग्राऊंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रद्द करण्यासाठी सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता उच्च न्यायालयाने सिद्धरामय्या यांच्या विरोधात स्थगिती आदेश जारी केला आहे.

DK Shivakumar Siddaramaiah
Maratha Reservation : 'मराठा आरक्षणासाठी रक्त सांडायलाही मागे सरणार नाही'; युवकानं CM शिंदेंना लिहिलं रक्तानं पत्र

निरीक्षक झहिदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. सिद्धरामय्या, कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, एम. बी. पाटील, प्रियांक खर्गे, व्ही. एस. उग्राप्पा यांच्यासह एकूण ३६ नेत्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.