'शाळा आणि महाविद्यालयांत हिजाब घालण्यास सूट देण्याची मागणी म्हणजे, देश तोडण्याचा प्रयत्न आहे.'
एकीकडं सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) हिजाब वादावर (Karnataka Hijab Controversy) तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय, तर दुसरीकडं कर्नाटकात सुरु झालेलं आंदोलन महाराष्ट्र, दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचलंय. आता या हिजाब वादात भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी उडी घेतलीय. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास सूट देण्याची मागणी म्हणजे, देश तोडण्याचा प्रयत्न असल्याचं सिंह यांनी म्हंटलंय.
मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, काही विशिष्ट वर्गातील लोक देशाचा कायदा ठरवू लागले आहेत. प्रांत आणि धर्माच्या नावाखाली देशाला तोडण्याचा प्रयत्न सुरुय. हे सगळं संपवायचं असेल, तर देशात समान नागरी कायदा आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. या वाढत्या घटनांमुळं देशात समान नागरी कायदा ही काळाची गरज बनलीय. यापूर्वीही गिरीराज सिंह यांनी अनेकवेळा समान नागरी कायद्याची मागणी केलीय. केंद्रीय मंत्र्याच्या या वक्तव्यावरून आगामी काळात हिजाबचा मुद्दा जोर धरू शकतो, हे स्पष्ट झालंय.
दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे नेते सीएम इब्राहिम (CM Ibrahim) यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितलं की, मुलींनी स्वत:चं डोकं झाकलं तर काय अडचण आहे? मुलींनी कमी कपडे घालावेत असं सरकारला वाटतं का? असे सवाल करत इब्राहिम म्हणाले, तुम्ही राजस्थानातील (Rajasthan) राजपूतांकडं पहा किंवा दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला दिसेल की, महिला त्यांच्या डोक्यावर पल्लू घालतात. त्यामुळं हिजाब वाद चुकीचा असून तो भाजपनं (BJP) सुरू केलाय. देवी लक्ष्मीच्या डोक्यावरही पल्लू आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्याचं समजतंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.