'काँग्रेस जिंकली तर हिंदूंना हिजाब घालायला लावणारा कायदा आणेल'

Karnataka Hijab Controversy
Karnataka Hijab Controversyesakal
Updated on
Summary

कॉलेज व्यवस्थापनानं हिजाब घालणं कॉलेज नियमांच्या विरोधात असल्याचं म्हटलंय.

Karnataka Hijab Controversy : हिजाबच्या वादावरून (Karnataka Hijab Disputes) कर्नाटकात राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधारी भाजप (BJP) आणि काँग्रेस पक्ष (Congress Party) आमनेसामने आहेत. कर्नाटक भाजपनं (Karnataka BJP) ट्विट केलंय की, या हिजाब वादामागं काँग्रेसचा तर 'हात' नाही ना? कारण, हायकोर्टात हिजाबच्या बाजूनं युक्तिवाद करणारे वकील काँग्रेसच्या लीगल सेलचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळं काँग्रेसनंच हा कट रचल्याचा आरोप भाजपनं केलाय.

Karnataka Hijab Controversy
Karnataka : हिजाब वादात आता पाकिस्तानच्या मलालाची उडी

आता या वादात कर्नाटकचे ऊर्जा मंत्री सुनील कुमार (Minister Sunil Kumar) यांनी उडी घेतलीय. त्यांनी म्हंटलंय, राज्यात काँग्रेस जिंकली तर हिंदूंना हिजाब (Karnataka Hijab Disputes) घालायला लावणारा कायदा आणेल, असा थेट आरोप करत सुनील कुमार यांनी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार (DK Sivakumar) यांच्यावर निशाणा साधलाय. काल डीके शिवकुमार यांनी तिरंगा काढल्याचा खोटा आरोप विद्यार्थ्यांवर केला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Karnataka Hijab Controversy
हिजाब वादामागं काँग्रेसचा 'हात'? भाजपचा गंभीर आरोप, वकील संतापले

काँग्रेस नेते शिवकुमार यांनी मंगळवारी ट्विट करून कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं म्हंटलं होतं. तिरंगा काढून तिथं भगवा ध्वज लावण्यात आला. शिवकुमार यांनी शिमोगा (Shimoga) जिल्ह्यातील एका महाविद्यालयात भगवा ध्वज लावणं ही निंदनीय घटना असल्याचं वर्णन केलंय. राष्ट्रध्वज ही देशाची शान असल्याचंही त्यांनी म्हंटलंय. तिरंगा खाली उतरवून भगवा ध्वज उभारण्यात आला. ही लज्जास्पद घटना आहे, असा त्यांनी ट्विटव्दारे संताप व्यक्त केलाय. कर्नाटकात 1 जानेवारीपासून हिजाबवरून वाद सुरू झालाय. कॉलेज व्यवस्थापनानं हिजाब घालणं कॉलेजच्या ड्रेस नियमांच्या (College Dress Rules) विरोधात असल्याचं म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.