Karnataka : दलित मुलानं हिंदू देवतेला स्पर्श केला म्हणून ठोठावला 60 हजारांचा दंड

दलित मुलानं हिंदू देवतेच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला 60 हजारांचा दंड ठोठावला आहे.
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkaresakal
Updated on
Summary

दलित मुलानं हिंदू देवतेच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला 60 हजारांचा दंड ठोठावला आहे.

बंगळुरू : देशात अस्पृश्यतेला अजिबात थारा नाही, असं नेहमी बोललं जातं. मात्र, अशीच एक धक्कादायक घटना कर्नाटकातून (Karnataka) समोर आलीय. एका दलित मुलानं (Dalit Boy) हिंदू देवाच्या (Hindu God) मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला 60 हजारांचा दंड ठोठावला आहे. ही घटना बंगळुरूपासून 60 किमी अंतरावर असलेल्या एका गावात घडलीय.

गावातील एका मिरवणुकीत दलित कुटुंबातील मुलानं हिंदू देवतेच्या मूर्तीला स्पर्श केला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शोभम्मा ही कर्नाटकातील कोलार (Karnataka Kolar) जिल्ह्याजवळील हुल्लेरहल्ली गावातील रहिवासी आहे. 9 सप्टेंबर रोजी गावात भुतायम्मा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रेत दलितांना मंदिरात प्रवेश दिलं जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मालूर तालुक्यातील हुल्लेरहल्ली गावात यात्रेनिमित्त मिरवणूक निघणार होती. त्याचवेळी मुलानं तिथल्या मूर्तीला स्पर्श करून ती उचलण्याचाही प्रयत्न केला. हा सगळा प्रकार तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला आणि त्यांना खटकला. ही मूर्ती उत्सवासाठी तयार करण्यात आली होती. मिरवणुकीत मुलानं थेट सिद्धिराण्णाच्या मूर्तीला स्पर्श केल्यानं वाद अधिक चिघळला.

Dr. Babasaheb Ambedkar
Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार

दरम्यान, पंचायतीनं आपल्या आदेशात मुलाच्या कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. जोपर्यंत दंड भरला जात नाही तोपर्यंत संबंधित मुलगा गावात येऊ शकत नाहीत, असंही सांगण्यात आलं आहे. या प्रकरणानंतर शोभम्मा म्हणाल्या, 'जर देवाला आमची इच्छाच नसेल तर आम्ही त्याची पूजा करणार नाही. यापुढं आम्ही फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच (Dr. Babasaheb Ambedkar) पूजा करू.' गावात 75-80 घरं असल्याचं एका स्थानिक नागरिकानं सांगितलं. यातील बहुतांश कुटुंबं वोक्कलिगा समाजातील आहेत. तर, गावात दलितांची सुमारे 10 घरं आहेत. शोभम्माचं घर गावच्या सीमेवर असून त्यांचा मुलगा जवळच्या गावात दहावीत शिकतो.

Dr. Babasaheb Ambedkar
देशभरात PFI च्या अनेक ठिकाणांवर NIA, ED ची मोठी कारवाई; 100 हून अधिक लोकांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.