Muslim Girls : मुस्लीम मुलींच्या हिजाबविरुध्द विद्यार्थी आक्रमक

Government Degree College
Government Degree Collegeesakal
Updated on
Summary

या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.

कर्नाटकातील (Karnataka) एका सरकारी पदवी महाविद्यालयाच्या (Government Degree College) व्यवस्थापनाला एका विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतोय. मुस्लीम महिला (Muslim Women) हिजाब परिधान करून कॉलेजमध्ये येण्याच्या निषेधार्थ भगवा स्कार्फ परिधान केलेल्या विद्यार्थ्यांचा एक गट कॉलेजमध्ये येऊ लागलाय. वाढता वाद पाहून कॉलेज व्यवस्थापनानं 10 जानेवारीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना स्वत: च्या मर्जीचा पोशाख परिधान करून येण्याची परवानगी दिलीय.

कर्नाटकातील बालागडी, कोप्पा (Balagadi, Koppa) येथील शासकीय पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य अनंत मूर्ती (Principal Anant Murti) यांनी पीटीआयला सांगितलं की, आम्ही 10 जानेवारी रोजी पालक आणि शिक्षकांची बैठक घेत आहोत, ज्यात ड्रेस कोडबाबत सर्वांची संमती घेतली जाईल. सध्या महाविद्यालय प्रशासनानं विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे हिजाब आणि भगव्या रंगाचे कपडे घालण्याची परवानगी दिलीय. तीन वर्षांपूर्वी अशाच एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता आणि आतापर्यंत सर्वांनी त्याचं पालन केलंय. सर्व काही सुरळीत चालू होतं, पण काल ​​अचानक काही विद्यार्थी स्कार्फ घालून वर्गात आले. ते काही विद्यार्थिनींच्या ड्रेस कोडवर (Dress Code) आक्षेप घेत होते. मुस्लिम महिला हिजाब घालून कॉलेजमध्ये येत असल्याचा आरोप बी.कॉमच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी विनय कोप्पा यानं केलाय.

Government Degree College
शुभ मुहूर्ताच्या नावाखाली पत्नी 11 वर्षांपासून सासरी गेलीच नाही

तीन वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असाच वाद निर्माण झाला होता आणि कोणीही हिजाब घालून कॉलेजमध्ये यायचं नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही मुस्लिम महिला हिजाब घालून कॉलेजमध्ये येत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं भगवा स्कार्फ घालून कॉलेजमध्ये येण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यानं असाही दावा केलाय की, कॉलेज प्रशासनानं मुस्लिम महिलांना कॅम्पसमध्ये हिजाब घालू नये, असं वारंवार सांगितलं होतं. परंतु, त्यांनी ते मान्य केलं नाही. या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.

Government Degree College
Ferozepur Rally : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.