BJP-JDS Alliance : 'मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, लोकसभेसाठी भाजप-धजद युती अंतिम टप्प्यात'; ज्येष्ठ नेते येडियुराप्पांची माहिती

लोकसभा निवडणुकीत राज्यात २५-२६ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे.
BJP-JDS Alliance BS Yediyurappa
BJP-JDS Alliance BS Yediyurappa esakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कर्नाटकमधील धजद सोबत युती करण्याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे.

बंगळूर : येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) कर्नाटकमधील धजद सोबत युती करण्याबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. केंद्रीय नेते यावर अंतिम निर्णय घेतील, असे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा (BS Yediyurappa) यांनी बुधवारी सांगितले.

BJP-JDS Alliance BS Yediyurappa
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल कोणी घडवली, खरे मास्टरमाईंड कोण? 'या' सहा जणांची नाव घेत पावसकरांचा मोठा गौप्यस्फोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे केंद्रीय नेतृत्व युतीबाबत निर्णय घेतील. जागावाटपाचा निर्णय हा केंद्रीय नेत्यांवर सोडला आहे. येडियुराप्पा २०२४ च्या लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आहेत.

BJP-JDS Alliance BS Yediyurappa
Raju Shetti : 'शरद पवारांच्या पाठीत खंजिर खुपसला, तसंच धनंजय मुंडे एक दिवस अजितदादांच्या पाठीत खंजिर खुपसतील'

लोकसभा निवडणुकीत राज्यात २५-२६ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी राज्यभर जिल्हा कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केल्याबद्दल ते म्हणाले, ‘मोदींसमोर ते शून्य आहेत. मागीलवेळी मिळाले होते तेवढ्याच जागा २०२४ मध्ये मिळतील. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.