RSS : 'एक दिवस सर्व मुस्लिम-ख्रिश्चन RSS मध्ये सामील होतील'

KS Eshwarappa on RSS
KS Eshwarappa on RSSesakal
Updated on
Summary

तुम्ही सभापतीच्या खुर्चीवर बसून 'आमचा आरएसएस' म्हणता, ते तुम्हाला शोभतं का?

बंगळुरू : कर्नाटकचे मंत्री (Minister of Karnataka) आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) यांनी विधानसभेत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. यामुळं सभागृहात गोंधळ उडाला होता. ईश्वरप्पा म्हणाले, भविष्यात असा एक दिवस येईल जेव्हा देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) जोडतील. कर्नाटक ग्रामीण विकास मंत्र्याच्या या वक्तव्यानं विधानसभेत गोंधळ उडाला. दरम्यान, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी (Vishweshwar Hegde Kageri) यांनी सभागृहात 'आमचा आरएसएस' शब्द वापरला आणि ते म्हणाले, एक दिवस येईल जेव्हा विरोधी आमदारही तेच म्हणतील. या विधानानंतर ईश्वरप्पांनी सभापतींना पाठिंबा दिला. मात्र, काँग्रेस सदस्यांनी यावर जोरदार आक्षेप घेतलाय.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Former Chief Minister Siddaramaiah) यांनी भाजपच्या या विधानावर परखडपणे टीका केलीय. काँग्रेस नेते म्हणाले, माझा आरएसएसला पूर्णपणे विरोध आहे. कारण, त्यांच्यामुळेच या देशात ‘मनुवाद’ प्रस्थापित होत आहे. भाजप म्हणत आहे, तो दिवस कधीच येणार नाहीय. त्यांनी फक्त त्या दिवसाची वाटच पाहत बसावी, असा टोला त्यांनी लगावलाय.

KS Eshwarappa on RSS
मदरशांच्या शाळेत यापुढे 'राष्ट्रगीत' असणार बंधनकारक : मदरसा बोर्ड

मंत्री ईश्वरप्पा पुढे म्हणाले, या देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन (Muslim and Christian) आज नाही तर भविष्यात एक दिवस स्वतःला आरएसएसशी जोडतील. यात शंका नाही. मंत्र्याच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या काही आमदारांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय. सभापतींच्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेसचे आमदार प्रियांक खर्गे यांनी गेल्या वर्षी अध्यक्षस्थानावरून संविधानावरील चर्चेदरम्यान घटनात्मक मूल्यांवर बोललं होतं, असं अधोरेखित केलं. यावर हस्तक्षेप करताना महसूल मंत्री आर अशोक म्हणाले, आरएसएस 'सर्व-व्यापी आणि सर्वस्पर्शी' झाला आहे. तर काँग्रेसच्या काही आमदारांनी हे देशाचं 'दुर्भाग्य' असल्याचा उल्लेख केलाय. काँग्रेस आमदार जमीर अहमद खान म्हणाले, तुम्ही सभापतीच्या खुर्चीवर बसून 'आमचा आरएसएस' म्हणता, ते तुम्हाला शोभतं का? असा सवाल त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.