MLC Election : भाजपनं निवडणुकीचं मैदान मारलं; पण एकानं बहुमत हुकलं

Karnataka MLC Election
Karnataka MLC Electionesakal
Updated on
Summary

राज्यात भाजपनं 25 पैकी फक्त 11 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसनं 'इतक्या' जागा जिंकल्या आहेत.

बंगळुरू : कर्नाटकात (Karnataka) झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Legislative Council Election 2021) सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (Bharatiya Janata Party) बहुमत मिळवण्यात केवळ एका जागा कमी पडलीय. म्हणजेच, भाजपनं 25 पैकी फक्त 11 जागा जिंकल्या आहेत, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनं (Congress) तेवढ्याच जागा जिंकल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं, की भाजप आणि काँग्रेसनं राज्यातील 20 स्थानिक प्राधिकरणांमध्ये 25 पैकी 11 मतदारसंघ जिंकले. विधान परिषदेची ही निवडणूक 10 डिसेंबर रोजी पार पडली आणि काल मंगळवारी (14 डिसेंबर) मतमोजणी झाली.

अधिकार्‍यांनी सांगितलं, की विरोधी JD(S) नं दोन जागा जिंकल्या आणि एका अपक्ष उमेदवारानं एक जागा जिंकलीय. बेळगाव मतदारसंघात (Belgaum Constituency) दोनपैकी एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकलीय. जेडीएसनं एकूण सहा जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी फक्त दोन जागा जिंकता आल्या. यामध्ये हसन मतदारसंघातून (Hasan Constituency) माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (HD Deve Gowda) यांचे नातू सूरज रेवन्ना यांच्यासह म्हैसूरमधील आणखी एका जागेचा समावेश आहे.

Karnataka MLC Election
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट

या निकालांसह 75 सदस्यांच्या सदनात भाजपच्या सदस्यांची संख्या आता 32 वरून 37 वर पोहोचलीय, तर बहुमतासाठी त्यांना 38 जागांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे साध्या बहुमतापेक्षा एका जागेवर पक्ष अडकलाय. आता परिषदेतील काँग्रेसची संख्याही 29 वरून 26 वर आलीय आणि जेडीएसची संख्याही 12 वरून 10 वर आली आहे. दरम्यान, विधेयक मंजूर करून घेण्यासाठी भाजपला यापुढं जेडीएसचा (JDS) पाठिंबा घ्यावा लागणार नाही आणि विरोधात असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसलाही भाजप सरकारची विधेयकं रोखता येणार नाहीत, असं स्पष्ट झालंय. मात्र, अपक्ष त्यांच्यासोबत असतील तरच हे शक्य आहे. 2015 मध्ये स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून गेल्या विधानपरिषद (MLC) निवडणुकीत भाजपनं अनुक्रमे 6 जागा, काँग्रेस 14 आणि JD(S) 4 जागा जिंकल्या, तर अपक्षांना एक जागा मिळाली होती.

Karnataka MLC Election
कर्नाटकात 12 जागा मिळवत भाजपची जोरदार मुसंडी; कॉंग्रेसला मिळाल्या 11 जागा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()