शेतकरी 30 मिनिटांत 10 लाखांची रोकड घेऊन पोहोचला Mahindra Showroom मध्ये

Tumakuru Farmer Kempegowda
Tumakuru Farmer Kempegowdaesakal
Updated on
Summary

'महिंद्रा शोरूमचे कर्मचारी माझ्या घरी आले आणि त्यांनी माफी मागितलीय.'

कर्नाटकातील तुमकूरमधील (Karnataka, Tumakuru) शेतकरी केंपेगौडा आरएल (Kempegowda R L) यांना एका वादानंतर महिंद्रा बोलेरो पिकअप (Mahindra Bolero Pickup) मिळालीय. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या प्रतिक्रियेनंतर आणि कंपनीच्या माफीनाम्यानंतर हे वाहन सन्मानपूर्वक केंपेगौडा यांना देण्यात आलंय.

Tumakuru Farmer Kempegowda
असली कसली परीक्षा! गाडीचे हेडलाइट लावून विद्यार्थ्यांनी सोडवले पेपर

'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना केंपेगौडा म्हणाले, महिंद्रा शोरूमचे कर्मचारी माझ्या घरी आले आणि त्यांनी माफी मागितलीय. मला बोलेरो पिकअप वाहन खूप आवडलंय. मी ही गाडी सध्या कर्जावर घेतलीय. सुरुवातीचे पैसे भरले असून मी या गाडीतून भाजीपाला आणि नारळ घेऊन जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. नुकतीच महिंद्राचे सीईओ आनंद महिंद्रा यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ट्विट करून म्हटलंय, '@MahindraRise चा मुख्य उद्देश आमच्या समुदायाला आणि ग्राहकांना सक्षम करणं आहे. तसंच व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि जर कोणी धोरण मोडेल, तर या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली जाईल, असं त्यांनी नमूद केलंय.

Tumakuru Farmer Kempegowda
32000 प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षक पदांसाठी भरती; त्वरित करा अर्ज

यानंतर Mahindra Automotive नं ट्विटरवर अधिकृत निवेदन जारी करून शेतकरी केंपेगौडा यांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितलीय. कंपनीनं म्हटलंय की, आमचा ग्राहक केंपेगौडा आणि त्यांच्या मित्रांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं म्हणत त्यांनी केंपेगौडा यांची माफी मागितलीय.

Tumakuru Farmer Kempegowda
शिवसेना पुरस्कृत उमेदवारानं गळ्यात बुटांचा हार घालून सुरु केला 'प्रचार'

जाणून घ्या काय होतं प्रकरण?

तुमकूर येथील शेतकरी केंपेगौडा आपल्या मित्रांसोबत गाडी खरेदी करण्यासाठी महिंद्रा शोरूममध्ये Mahindra Showroom गेला होता. यावेळी एका सेल्समननं त्याला गरीब समजून अपमानित केलं. सेल्समन केंपेगौडाला म्हणाला, शेतकऱ्याकडं 10 रुपयेही नाहीत आणि 10 लाखाचा तर विषयच सोडा, असं म्हणून त्यानं हिणवलं. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून शेतकरी 30 मिनिटांत 10 लाखांची रोकड घेऊन महिंद्रा शोरूममध्ये पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.