'कर्नाटकच्या राजकारणातही एकनाथ शिंदे-अजित पवार, त्यामुळं काहीही घडू शकतं'; माजी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

लोकसभा निवडणुकीत धजदला चार लोकसभा मतदारसंघ देण्याचे मोदींनी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
Karnataka politics
Karnataka politicsesakal
Updated on
Summary

अलीकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नवखे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते.

बंगळूर : आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections) युती करण्याचा निर्णय घेतलेल्या धजद आणि भाजप यांच्यातील जागावाटप प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली. भाजप (BJP) नेते लोकसभेच्या चार जागा धजदला देण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान, धजदचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी आज सकाळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.

Karnataka politics
देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लवकरच 'रामराज्य' येईल; जितेंद्र सरस्वती महाराजांचं मोठं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत धजदला चार लोकसभा मतदारसंघ देण्याचे मोदींनी मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून सर्व गोष्टींना अंतिम रूप देण्यात येणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात भेट घेऊन सर्व गोष्टींवर चर्चा केली. मात्र कुमारस्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत धजदला सात जागा सोडाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, भाजप नेत्यांनी धजदला चार जागाच देण्याची तयारी दर्शवली आहे.

कुमारस्वामी यांनी हासन, मंड्या, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, कोलार, म्हैसूर आणि बंगळूर ग्रामीण मतदारसंघ अशा सात जागा धजदला सोडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भाजप नेत्यांनी चारच जागा सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. भाजपने हासन, मंड्या, चिक्कबळ्ळापूर आणि बंगळूर ग्रामीण या चार जागा धजदला देण्याची तयारी दर्शविली आहे.

जुन्या म्हैसूरमध्ये धजद मजबूत असल्याने त्या भागातील जागा धजदला सोडून इतर भागांमध्ये भाजपचे उमेदवार उभे करून किमान २० जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्याशी कुमारस्वामी स्वतंत्रपणे चर्चा करतील.

Karnataka politics
शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं मत

जागा वाटपाबाबत संभ्रम नाही - कुमारस्वामी

भाजप आणि धजद पक्षांमध्ये जागावाटपाबाबत कोणताही संभ्रम नाही. आम्ही जितक्या जागा जिंकू तितक्या जागा आम्ही भाजपकडे मागू. जागांच्या वाटपावर लवकरच अंतिम निर्णय होईल, असे कुमारस्वामी म्हणाले. मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही, असेही कुमारस्वामी यांनी सांगितले. निखिल कुमारस्वामी देखील लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. निखिल दोनदा निवडणूक हरला आहे, हे खरे आहे. मात्र निखिलला उमेदवारी देण्याबाबत पक्षाने निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Karnataka politics
UNESCO Survey : भारतातील 'हे' विमानतळ बनले जगातील सर्वात सुंदर विमानतळ; UNESCO कडून जागतिक पुरस्कार जाहीर

कर्नाटकातही शिंदे, पवार

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेसचे सरकार पडू शकते का, या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले की, कर्नाटकच्या राजकारणातही शिंदे आणि अजित पवार आहेत. अलीकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नवखे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.