काँग्रेस नेते, मंत्र्यांना सत्तेचा माज चढलाय; भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांचा पहिल्याच भाषणात काँग्रेसवर घणाघात

राज्यातील मंत्र्यांमध्ये अहंकार आणि सत्तेचा माज चढलेला आहे. या सरकारला हटवले पाहिजे.
BJP New State President BY Vijayendra
BJP New State President BY Vijayendraesakal
Updated on
Summary

२८ पैकी २८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याबरोबरच पुढील विधानसभा निवडणुकीतही राज्याला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यासाठी कठोर परिश्रम करु.

बंगळूर : राज्यातील मंत्र्यांमध्ये अहंकार आणि सत्तेचा माज चढलेला आहे. या सरकारला हटवले पाहिजे, असे भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र (B. Y. Vijayendra) म्हणाले. मल्लेश्वर येथील जगन्नाथ भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते बोलत हाते.

BJP New State President BY Vijayendra
Raju Shetti : ..म्हणून ते ED च्या भीतीने इकडे-तिकडे उंदरासारखे पळत सुटलेत; राजू शेट्टींचा कोणावर निशाणा?

ते म्हणाले, "राज्यात भीषण दुष्काळ असूनही सरकारने (Congress Government) कोणतीही पावले उचललेली नाहीत. आतापर्यंत एकाही मंत्र्याने दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केला नाही. अवघ्या सहा महिन्यांतच सरकारच्या मंत्र्यांचा सुरुवातीचा उत्साह मावळला आहे. मंत्र्यांमध्ये अहंकार आणि सत्तेचा माज भरलेला आहे. या सरकारला हटवण्याचे काम झाले पाहिजे.

सरकार आमदारांच्या मतदारसंघांना एक रुपयाही देत नाही. हा प्रकार त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने उघड केला आहे. आगामी काळात भ्रष्ट सरकारला सडेतोड उत्तर देऊ. राज्यातील पक्ष संघटनेसाठी प्रामाणिकपणे काम करू. कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

BJP New State President BY Vijayendra
वीज चोरी करणं भोवलं! माजी मुख्यमंत्र्यांविरुद्ध FIR दाखल; JDS कार्यालयाबाहेर लागले अपमानास्पद पोस्टर

राज्यात नवे सरकार आले आहे. ४० टक्के कमिशन देणारे सरकार म्हणून आमच्यावर टीका झाली. त्यावर मतदारांचाही विश्वास बसला. काँग्रेसचे नवे सरकार येऊन सहा महिने झाले आहेत. दिवसाढवळ्या लूटमार आणि भ्रष्टाचाराच्या पलीकडे गेले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच आता ४० टक्के कमिशन घेऊन भ्रष्टाचार करीत असल्याची खिल्ली विजयेंद्र यांनी उडविली.

ते पुढे म्हणाले, "राज्यात लवकरच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका होणार आहेत. त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ. २८ पैकी २८ लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्याबरोबरच पुढील विधानसभा निवडणुकीतही राज्याला भाजपचा बालेकिल्ला बनवण्यासाठी कठोर परिश्रम करु, अशीही त्यांनी ग्वाही दिली. माजी मंत्री के. एस. ईश्वराप्पा, आर. अशोक, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, व्ही. गोपालय, अरगा ज्ञानेंद्र आणि इतर अनेकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

BJP New State President BY Vijayendra
अजितदादांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' आमदारानं अचानक घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

काही नेते गैरहजर

व्ही. सोमण्णा, बसनगौडा पाटील-यत्नाळ, अरविंद बेल्लद हे असंतुष्ट आहेत. ज्यांना भाजपमध्ये महत्त्वाचे स्थान मिळण्याची अपेक्षा होती, त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला नाही. त्याबद्दल चर्चा झाली. मध्य प्रदेश निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या सी. टी. रवी यांनी विजयेंद्र यांना तेथून शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.