भाजपचे माजी आमदार सुकुमार शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली.
बंगळूर : राज्यात ‘ऑपरेशन हस्त’ला (Operation Hasta) वेग आला आहे. उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पडद्यामागे रणनीती आखत आहेत. भाजपच्या आमदार आणि माजी आमदारांनी त्यांची भेट घेतल्यानंतर राज्यभर उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवकुमार यांच्या हालचालीमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाने त्रस्त झालेला भाजप अजूनही सावरलेला नाही. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी योग्य नेतृत्व नाही. अशा परिस्थितीत शिवकुमार ‘ऑपरेशन हस्त’ला वेग देत आहेत.
उघडपणे कोणालाही काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न आतापर्यंत झाले नसले, तरी भाजपचे आमदार, माजी आमदार आणि शिवकुमार यांची भेट उत्सुकता वाढविली आहे. शिवकुमार यांनी यापूर्वीच भाजप आमदार शिवराम हेब्बार आणि माजी खासदार शिवरामेगौडा यांची भेट घेतली आहे.
तसेच माजी आमदार पूर्णिमा श्रीनिवास यांच्या निवासस्थानी भेट दिली. शिवकुमार यांनी माजी आमदार सुकुमार शेट्टी आणि बैंदूर येथील गोपाल पुजारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सुकुमार शेट्टी यांना काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
विधानसभेच्या पराभवानंतर विरोधी पक्षनेते निवडीला झालेल्या विलंबाने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र भाजपचे नेतृत्व आपल्या आमदारांना रोखण्यात अपयशी ठरत आहे. असंतुष्ट आमदार, माजी आमदारांना काँग्रेसमध्ये आणण्याच्या प्रयत्नाना वेग आला आहे. विशेषतः शिवकुमार स्वतः रिंगणात उतरले आहेत. ते स्वत: ‘ऑपरेशन हस्त’वर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सुकुमार शेट्टी यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानाजवळ प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘ऑपरेशन हस्त’ आणि ‘ऑपरेशन कमळ’ या दोन्हींच्या विरोधात आहे. आम्ही काँग्रेसमध्ये येणाऱ्यांसमोर मैत्रीचा हात पुढे करू. ‘भारत जोडो’ या आमच्या पक्षाच्या तत्त्वज्ञानानुसार आम्ही आलिंगन देऊ. किती लोक सामील होणार आहेत, याची यादी सांगता येणार नाही.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार सुकुमार शेट्टी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. मंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, ‘‘गुरुवारी मी बंगळुरमध्ये शृंगेरीचे आमदार राजेगौडा यांच्यासह शिवकुमार यांची भेट घेतली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.