BJP : 'या' प्रकरणात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग नसेल, तर राजीनामा देईन; भाजप आमदाराचं मोठं विधान, अमित शहांची घेणार भेट

गेल्या ४ वर्षांपासून डीकेंशी आपल्याला त्रास देत असून वेगवेगळ्या ठिकाणाहून धमकीचे फोन येत आहेत.
Ramesh Jarkiholi
Ramesh Jarkiholiesakal
Updated on
Summary

डी. के. शिवकुमार हे कोतवाल रामचंद्र यांचे शिष्य असून आपल्या सदाशिवनगर बंगळूर येथील निवासस्थानी काही गुंडांना पाठवून घरासमोर अश्लील छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

बेळगाव : राज्यातील सीडी फॅक्टरी बंद व्हायची असल्यास सीबीआय चौकशी करण्यात यावी, सीडी प्रकरणात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचा सहभाग नसल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असे आव्हान माजी मंत्री आणि आमदार रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी दिले.

मंगळवारी (ता. ३१) बेळगाव येथील सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी जारकीहोळी यांनी शिवकुमार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. डीकेंनी सर्वत्र सीडी फॅक्टरी तयार केली आहे. विदेशातून व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत. त्यांनी कोणाशी संभाषण केले आहे.

Ramesh Jarkiholi
'लवकरच काँग्रेसचं सरकार कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल'; भाजप आमदाराच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर

याबाबत आपल्याकडे पुरावे असून ते खोटे असल्याचे सिद्ध करावेत सिद्ध केल्यास आपण आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. डी. के. शिवकुमार हे कोतवाल रामचंद्र यांचे शिष्य असून आपल्या सदाशिवनगर बंगळूर येथील निवासस्थानी काही गुंडांना पाठवून घरासमोर अश्लील छायाचित्रे लावण्यात आली आहेत. हे कृत्य डीकेशिंच्या समर्थकाकडून झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

Ramesh Jarkiholi
Maratha Reservation : कुणबीच्या 20 हजार नोंदी शिंदे समितीला सापडण्याची शक्यता; 15 ते 20 लाख लोकांना होणार फायदा

सीडी प्रकरणात आपला अपमान झाला असता, आपण काहीही केलं असतं, परंतु मी सहनशीलता बाळगली. गेल्या ४ वर्षांपासून डीकेंशी आपल्याला त्रास देत असून वेगवेगळ्या ठिकाणाहून धमकीचे फोन येत आहेत. हे सर्व कोतवाल रामचंद्र यांच्या शिष्याकडूनच शक्य असल्याचा टोला जारकीहोळी यांनी लगावला. सदाशिवनगर येथील आपल्या घरावरील पोस्टर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी गृहमंत्री आणि डीआयजींकडेही पत्राद्वारे केली आहे.

Ramesh Jarkiholi
Maratha Reservation साठी कोकणातून पहिला राजीनामा; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं पक्षाला दिली सोडचिठ्ठी

अमित शहांची भेट घेणार

येत्या सहा अथवा सात नोव्हेंबरला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विनंती करणार आहोत. पक्षाच्या वतीने आंदोलनाचा विचार आहे. डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस आमदार रवी गाणिग यांच्या विरोधात पुढील आठवड्यात दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती रमेश जारकीहोळी यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.