मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
CM Siddaramaiah vs DK Shivakumar
CM Siddaramaiah vs DK Shivakumaresakal
Updated on
Summary

मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी केवळ सहा महिने पूर्ण केले असताना, अचानक पुढची पाच वर्षे मीच मुख्यमंत्री असे विधान केले, या विधानामागचा नेमका हेतू काय?

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचे वक्तव्य केल्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी केवळ सहा महिने पूर्ण केले असताना, अचानक पुढची पाच वर्षे मीच मुख्यमंत्री असे विधान केले, या विधानामागचा नेमका हेतू काय? असा आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काल होस्पेट येथे बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ मीच पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य केले.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
Karnataka Politics : कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पाच वर्षे मीच..

त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून, काँग्रेसमध्येही (Congress) विरोधी मत व्यक्त केले जात आहे. मात्र अडीच वर्षांनी मुख्यमंत्री होऊ इच्छिणारे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मी फक्त हायकमांडचेच ऐकणार असल्याचे त्यांनी मार्मिक विधान केले.

त्यांच्या या वक्तव्याचीही आता जोरात चर्चा आहे. यावर अनेक मंत्री आणि आमदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसमध्ये आगामी काळात काहीही होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत. हायकमांडच्या आदेशानंतरही मुख्यमंत्री पदाबाबत मंत्री आणि आमदारांची वक्तव्ये सुरूच आहेत.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
Kunbi Certificate : वाळवा, शिराळ्यात सर्वाधिक कुणबी नोंदी; दुष्काळी तालुक्यांत नोंदीच नाहीत, शासनाला करणार अहवाल सादर

हायकमांड काय संदेश देणार?

दोन दिवसांपूर्वीच एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाल, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या सोबत दोन तासांहून अधिक वेळ बैठक घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कोणत्याही मुद्द्यावर कोणीही उघडपणे बोलू नये, असा इशारा दिला. पण बोलणे अद्यापही थांबलेले नाही. यावर हायकमांड आता काय संदेश देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

..तर मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास मीही तयार : प्रियांक खर्गे

मुख्यमंत्री कोण असावे याचा निर्णय पक्ष हायकमांड घेते. जर हायकमांडने मला पदभार स्वीकारण्यास सांगितले तर मी त्याचे पालन करीन, असे मंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी शुक्रवारी सांगितले. प्रियांक हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) कम्युनिकेशनचे अध्यक्ष आहेत. आरडीपीआर विभागाच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रियांक म्हैसूरमध्ये आहेत. ‘मी पक्षाचा शिपाई आहे. हायकमांडच्या निर्णयाचा आदर करेन. प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचे आहे, आणि यात काहीही चुकीचे नाही, परंतु या विषयावर अंतिम निवड हायकमांडच करते,” असे ते पुढे म्हणाले.

शिवकुमारांची गुप्त चाल

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया न देता मी हायकमांडचे म्हणणे ऐकून घेईन, पक्षात कोणताही असंतोष नसल्याचे उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणत असले तरी ते शांत बसणारे नाहीत. हायकमांडस्तरावर काय होणार याविषयी आता औत्सुक्य आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बोलण्यावर शिवकुमार यांची आगामी काळात वाटचाल कशी असेल, अशी चर्चा रंगू लागली असून, शिवकुमार यांची ही वाटचाल सध्या तरी गूढच असल्याचे दिसत आहे.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
Raju Shetti : 'जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही'; राजू शेट्टींचा कारखानदारांना स्पष्ट इशारा

मंत्र्यांना आज स्नेहभोजनाचे निमंत्रण

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदावरील चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी शनिवारी (ता. ४) सर्व मंत्र्यांसाठी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. यावेळी पुढील लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी सर्व मंत्र्यांना उद्या न्याहारीसाठी आपल्या निवासस्थानी येण्याचे त्यांनी निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या उत्तर कर्नाटकच्या दौऱ्यावर असून ते आज संध्याकाळी बंगळूरला परतणार आहेत.

सिद्धरामय्या यांना आता मुख्यमंत्रिपद पुरे असे वाटत असेल, तर नवीन मुख्यमंत्री निवडताना परमेश्वर हेच मुख्यमंत्री व्हायला हवेत. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही नेहमीच सिद्धरामय्या यांच्या बाजूने आलो आहोत.

-के. एन. राजण्णा, सहकारमंत्री

मुख्यमंत्री पाच वर्षे की अडीच वर्षे याची केवळ सिध्दरामय्या, डी. के. शिवकुमार यांनाच माहिती आहे. याबद्दल आपल्यापैकी कोणालाच माहिती नाही. दिल्लीतील नेत्यांनी सरकार स्थापनेदरम्यान काय निर्णय घेतला हे फक्त त्यांनाच माहीत. मी खरे काय आणि खोटे काय याचा न्याय करू शकत नाही.

-जी. परमेश्वर, गृहमंत्री

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
'त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही'; सुषमा अंधारें‍विरोधात शंभूराज देसाई आक्रमक, पाटण न्यायालयात दाखल केली तक्रार

उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार मुख्यमंत्री व्हावेत, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानाला काँग्रेसमधील अनेक लोक विरोध करत आहेत, हे लक्षात घेता मुख्यमंत्रिपदासाठी लढाई सुरू असल्याचे नाकारता येत नाही. येत्या काही दिवसांत ती तीव्र होणार आहे.

-इक्बाल हुसेन, आमदार, रामनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.