'माझ्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पाच जबाबदार'; हॉटेलमध्ये आढळला ठेकेदाराचा मृतदेह

KS Eshwarappa
KS Eshwarappaesakal
Updated on
Summary

मृत संतोष पाटील यांचा मृतदेह खासगी लॉजच्या खोलीत आढळून आला आहे.

बेळगावचे ठेकेदार संतोष पाटील (Contractor Santosh Patil) मंगळवारी उडुपीतील (Udupi) एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले. या ठेकेदारानं कर्नाटक सरकारमधील (Karnataka Government) मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K S Eshwarappa) यांच्यावर 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप केलाय. संतोष पाटील यांच्या निधनाचं वृत्त आल्यानंतर काँग्रेसनं (Congress) मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केलीय. काँग्रेसच्या आरोपाचं खंडन करताना ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री ईश्वरप्पा यांनी मृत व्यक्तीला ओळखत नसल्याचं सांगितलंय. यादरम्यान आणखी एक गोष्ट समोर आलीय, ती म्हणजे पाटील यांनी आपल्या कथित व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये त्यांच्या मृत्यूसाठी मंत्र्याला जबाबदार धरलंय.

KS Eshwarappa
JDU चा RJD ला दुहेरी झटका; प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचा पक्षात जाहीर प्रवेश

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष पाटील यांचा मृतदेह खासगी लॉजच्या खोलीत आढळून आला. पाटील यांचे मित्रही या खोलीच्या शेजारीच राहत होते. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी पाटील यांनी स्थानिक मीडियाला व्हॉट्सअॅपवर मेसेजही पाठवला होता. ते आत्महत्या करत असल्याचं सांगत त्यांच्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार आहेत, असं म्हंटलं होतं. या संदेशाबाबत मंत्र्यांनी आपण संतोषला ओळखत नसल्याचा पुनरुच्चार केलाय.

KS Eshwarappa
कन्नड संघटनांचा चिथावणीखोर इशारा; गावच्या फलकावरील 'महाराष्ट्र' शब्द गायब

ईश्वरप्पा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 'मी चुकीचा नाही हे अगदी स्पष्ट आहे. मानहानीचा खटला दाखल केल्यानंतर मी त्याला नोटीस पाठवलीय. आता त्यानं आत्महत्या केल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून येत आहे. याशिवाय, मला इतर काहीही माहिती नाही, असं त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे, मयत संतोष पाटील यांनी ईश्वरप्पा यांच्यावर कमिशन मागितल्याचा खळबळजनक आरोप केलाय. या आरोपामुळं कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडालीय. मात्र, मंत्री ईश्वरप्पा यांनी हे आरोप निराधार ठरवत ठेकेदारावर मानहानीचा खटलाही दाखल केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.