Loksabha Election : प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी; माजी मुख्यमंत्र्यांनाच बड्या नेत्यांचा विरोध

भाजपच्या दोन नेत्यांची पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने आता पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे.
BS Yediyurappa
BS Yediyurappaesakal
Updated on
Summary

माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विजयेंद्रसाठी मी कसे काम करावे?

बंगळूर : येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) भाजपच्या दोन नेत्यांची पक्षाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याने आता पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे. विशेषत: माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा (BS Yediyurappa) यांना सातत्याने विरोध करणाऱ्या गटाने या दोन्ही नियुक्त्यांना विरोध केला आहे.

BS Yediyurappa
जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍‍न मिटवा नाही तर..

त्यावरून पक्षांतर्गत असंतोष वाढत असून, तो शांत करण्याचे पक्ष नेत्यांपुढे मोठे आव्हान आहे. बसनागौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, अरविंद बेल्लद यांच्यासह अनेक आमदारांनी येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची पक्षाध्यक्षपदी आणि आर. अशोक यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष आणि आरएसएसच्या जवळचे सर्व आमदार नाराज झाले, असे सूत्रांनी सांगितले. अशोक आणि विजयेंद्र यांच्या पक्षाच्या सर्वोच्च पदांवर नियुक्तीला उत्तर कर्नाटकातील लिंगायत बालेकिल्ल्याच्या विविध गटांनीही विरोध केला आहे.

पंचमसाली पीठाचे जयमृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, ‘बंगळूर आणि शिमोगा या येथील नेत्यांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करून उत्तर कर्नाटकातील नेत्यांवर अन्याय केला गेला आहे. बसनागौडा पाटील-यत्नाळ यांच्यासारख्या पंचमसाली नेत्यांकडे दुर्लक्ष केले असून, उत्तर कर्नाटकला एक तरी पद द्यायला हवे होते.’

BS Yediyurappa
CM Siddaramaiah : 'विरोधी पक्षनेता कोणीही असो, सरकारला फरक पडत नाही'; मुख्यमंत्र्यांनी भाजपचा घेतला समाचार

गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनीही अशोक आणि विजयेंद्र यांची सर्वोच्च पदावर नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यांनी पक्ष निरीक्षकांची भेट घेऊन, बी. एस. येडियुराप्पा यांना पक्षप्रमुख म्हणून स्वीकारू, पण त्यांच्या मुलाला नाही, असे स्पष्ट केले.

माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विजयेंद्रसाठी मी कसे काम करावे? पक्षाने वरिष्ठ नेत्यांचा उच्च पदांसाठी विचार करायला हवा होता, असे ते म्हणाले. येडियुराप्पांच्या विरोधात विविध मंचांवर उघडपणे बोलणारे व भाजपचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यत्नाळ यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर ‘भाजप हा कौटुंबिक पक्ष बनू पाहात असेल, तर ते निष्ठावान भाजप कार्यकर्ते आणि हिंदू कार्यकर्ते कदापीही मान्य करणार नाहीत.

BS Yediyurappa
ऊसदराचा दोन दिवसांत निर्णय द्या, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोखणार; राजू शेट्टींचा कारखान्यांना कडक इशारा

उत्तर कर्नाटकातील लोकांनी नेहमीच भाजपला पाठिंबा दिला आणि मतदान केले. मात्र, दक्षिण कर्नाटकातील नेत्यांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. काही एजंटांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला गप्प बसण्यास सांगितले. पण, मी कोणत्याही दबावाला आणि डावपेचांसमोर झुकणार नाही’, असे सांगितले.

अशोक आणि विजयेंद्र यांना उच्च पदांवर नियुक्त केल्याने येडियुराप्पा पक्षावर नियंत्रण मिळवू शकतात, असे अनेक भाजप आमदारांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे काही आमदार या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीस छुपा विरोध करीत आहेत.

BS Yediyurappa
IND vs AUS ICC World Cup 2023 Final : रोहित शर्मा-राहुल द्रविडची 'रोरा'वणारी जोडी

सूत्रांनी सांगितले की, बी. एल. संतोष यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्यानंतर, लोकसभा निवडणुकीपूर्वी गमावलेल्या जागा परत मिळविण्याच्या प्रयत्नात येडियुरप्पा यांच्या दबावापुढे झुकण्याशिवाय पक्षाकडे दुसरा पर्याय दिसत नव्हता. यासाठी येडियुरप्पांना भाजप नेत्यांनी महत्त्व दिले आहे. मात्र याविरोधातील पक्षांतर्गत नाराजी वेळीच दूर न केल्यास त्याचे लोकसभा निवडणुकीत दूरगामी परिणाम होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.