Loksabha Election : लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन! 'या' खासदारांचं कापणार तिकीट, कोणाला मिळणार संधी?

पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अंतर्गत सर्वेक्षण सुरू केले आहे.
Karnataka Politics LokSabha Election 2024
Karnataka Politics LokSabha Election 2024esakal
Updated on
Summary

विजापूर लोकसभा मतदारसंघात (एसी राखीव मतदारसंघ) सलग सहावेळा खासदार राहिलेले रमेश जिगाजिनगी यांच्याऐवजी बाबू राजेंद्र नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

बंगळूर : अलीकडेच माजी मुख्यमंत्री आणि बंगळूर उत्तर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डी. व्ही. सदानंद गौडा यांनी निवडणुकीच्या (LokSabha Elections) राजकारणाला अलविदा केल्यानंतर भाजपचे अनेक ज्येष्ठ सदस्य विचलित झाले आहेत. यावेळी सदानंद गौडा यांच्याशिवाय सुमारे १० विद्यमान खासदारांना तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याचे मत सूत्रांनी व्यक्त केले आहे.

Karnataka Politics LokSabha Election 2024
Shivsena Politics : कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! प्रवक्ते भोगटेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी

आधीच दावणगेरेचे खासदार जी. सिद्धेश्वर आणि हावेरी-गदगचे खासदार एम. पी. शिवकुमार उदासी यांनी आपण पुढील लोकसभा निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्यासह जवळपास नऊ विद्यमान खासदारांसाठी तिकीट मिळणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जिगजिणगी, अंगडीना संधी नाही?

तुमकूरचे खासदार जी. एस. बसवराजू (वय ८२), दावणगेरेचे खासदार जी. सिद्धेश्वर (वय ७१), कारवारचे खासदार अनंतकुमार हेगडे (वय ५५), हावेरी-गदगचे खासदार शिवकुमार उदासी (वय ५६), बळ्ळारीचे खासदार वाय. देवेंद्रप्पा (वय ७२), कोप्पळचे खासदार संगण्णा करडी (वय ७३), रायचूरचे खासदार राजा अमरेश्वर नाईक (वय ६६), विजापूरचे खासदार रमेश जिगजीनगी (वय ७१), बागलकोटचे खासदार पी. सी. गद्दीगौडर (वय ७२) आणि बेळगावच्या खासदार मंगला अंगडी (वय ६०) यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Karnataka Politics LokSabha Election 2024
Raj Thackeray : ठरलं! गुहागरमधून मनसे निवडणूक लढवणार; गांधींना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

दावणगिरीचे खासदार जी. सिध्देश्वर यांनी आपला मुलगा जी. एस. अनितकुमार यांना तिकीट देण्याची विनंती पक्ष हायकमांडला आधीच केली आहे. मुलगा अमरेश करडी यांना तिकीट मिळावे, यासाठी करडी संगण्णाही प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते.

संभाव्य कोण?

विजापूर लोकसभा मतदारसंघात (एसी राखीव मतदारसंघ) सलग सहावेळा खासदार राहिलेले रमेश जिगाजिनगी यांच्याऐवजी बाबू राजेंद्र नाईक यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. बागलकोटच्या गद्दीगौडर यांच्या जागी निवृत्त आयएएस अधिकारी शिवयोगी कळसद यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. हावेरी-गदग मतदारसंघासाठी हायकमांड अनिल मेनसिनकाई यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या शिवकुमार उदासी हे तिथले खासदार आहेत.

बळ्ळारी लोकसभा मतदारसंघात (एसटी राखीव मतदारसंघ) देवेंद्रप्पा यांच्याऐवजी माजी मंत्री श्रीरामलू यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार रेणुकाचार्य हे दावणगेरेतून इच्छुक आहेत. त्यामुळे तिथे पक्ष हायकमांड काय निर्णय घेते ते पाहावे लागेल. रेणुकाचार्य येडियुराप्पा यांच्या जवळचे आहेत.

Karnataka Politics LokSabha Election 2024
Uday Samant : महाराष्ट्रातील 215 आमदारकीच्या आणि लोकसभेच्या 45 जागा आम्ही सहज जिंकू - उदय सामंत

वयही विचारात घेणार?

पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अंतर्गत सर्वेक्षण सुरू केले आहे. वयोगट आणि सर्वेक्षण अहवालानुसार यावेळी अंदाजे ८ ते १० खासदारांना तिकीट गमवावे लागण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.