BJP News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) राज्य भाजपमधील गटबाजी संपवण्यासाठी आणि राज्यातील नेत्यांमधील मतभेद संपवण्यासाठी रिंगणात उतरला आहे. यासाठी उद्या (ता. १२) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे..प्रदेश भाजपमधील मतभेद दूर करण्यासाठी आरएसएसच्या नेत्यांनी ही बैठक बोलावली असून, उद्याच्या बैठकीसाठी भाजपच्या ४० नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. बंगळुरातील चेन्नेनहळ्ळी, मागडी रोड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, भाजपचे प्रदेश प्रभारी राधामोहनदास, विरोधी पक्षाचे नेते आर. अशोक, चलवादी नारायणस्वामी, विधिमंडळ पक्षाचे उपनेते अरविंद बेल्लद, खासदार जगदीश शेट्टर, गोविंद काराजोळ, भाजपचे सरचिटणीस आणि आमदार व्ही. सुनीलकुमार, एन. रवीकुमार, माजी आमदार पी. राजीव, आमदार महेश टेंगीनाकई, बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, माजी खासदार जी. एम. सिद्धेश्वर, आमदार बी. पी. हरिश, माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांच्यासह सुमारे ४० भाजप नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत..असंतुष्ट गटातील नेत्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्रसह काही नेत्यांनी तडजोडीचे राजकारण केले आहे. वाल्मीकी विकास महामंडळाच्या घोटाळ्याविरोधात कुडल संगम ते बळ्ळारी असा मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणांनी भाजपमधील दुफळी उफाळून आली आहे. त्यानंतर विजयेंद्र यांनी काही नेत्यांसह दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेतली आणि असंतुष्ट नेत्यांच्या विरोधात तक्रार केली..असंतुष्ट नेत्यांना उघडपणे वादग्रस्त वक्तव्य न करण्याची ताकीद द्या. पदयात्रा काढायचीच असेल तर पक्षांतर्गत करू द्या, असे हायकमांडने राज्यातील नेत्यांना सांगावे, असे सुचविले होते. त्यावर पक्षश्रेष्ठींविरुद्ध उघडपणे बोलू नका, पक्षाच्या चौकटीत काम करा, अशा सूचना वरिष्ठांनी दिल्याचे समजते..यानंतर भाजपमध्ये सर्व काही थंडावल्याचे दिसत असले तरी असंतोष शमलेला नाही. भाजपमधील धुमसत असलेल्या मतभेदाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते उद्या सर्व नेत्यांची बैठक बोलावून नाराजी आणि असंतोष संपवण्याचा प्रयत्न करणार आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.