कर्नाटकच्या राजकारणातील मोठी बातमी! शिवकुमार-जारकीहोळींची गुप्त बैठक; चर्चेनंतर DK थेट दिल्लीला रवाना, काय घडणार?

जारकीहोळींच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात विशेषत: काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
Karnataka Politics
Karnataka Politicsesakal
Updated on
Summary

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवकुमार नवी दिल्लीत गेल्याचे सांगण्यात येत आहे.

बंगळूर : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांची गुप्त भेट घेऊन चर्चा केली. जारकीहोळी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.

Karnataka Politics
Satish Jarkiholi : कर्नाटकातील राजकारणाला वेगळं वळण; सिद्धरामय्यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? काँग्रेस हायकमांड घेणार अंतिम निर्णय!

क्रिसेंट रोडवरील जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात विशेषत: काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. बैठक संपल्यानंतर लगेचच शिवकुमार नवी दिल्लीला रवाना झाले. जारकीहोळी यांनी यापूर्वी बेळगावात शिवकुमार यांच्या हस्तक्षेपाबद्दल आक्षेप व्यक्त केला होता.

जारकीहोळी कुटुंबाच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या लिंगायत नेत्या म्हणून उदयास येत असलेल्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना शिवकुमार यांनी दिलेले महत्त्व आणि पाठिंबा पाहून मंत्री जारकीहोळी नाराज झाले. अलीकडेच शिवकुमार बेळगावात आले असता सतीश जारकीहोळी त्यांच्या स्वागत कार्यक्रमापासून दूर राहिले.

Karnataka Politics
Karnataka Politics : भाजप, धजदचे 35 आमदार लवकरच काँग्रेस पक्षात; उद्योग मंत्र्याच्या दाव्याने कर्नाटकात पुन्हा खळबळ

तसेच सिद्धरामय्या यांच्या रात्रीच्या डीनरपार्टीला उपस्थित राहिले. जारकीहोळी यांनी २०२८ मध्ये आपण मुख्यमंत्रीपदाचा दावेदार आहोत, असे वक्तव्यही केले होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जारकीहोळी यांनी शिवकुमार यांच्याशी पक्ष संघटना, लोकसभा निवडणूक आणि जिल्हाध्यक्ष बदलाबाबत चर्चा केली. त्याशिवाय अन्य कोणत्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Karnataka Politics
D. B. Chandregowda : इंदिरा गांधींसाठी खासदारकीचा राजीनामा देणारे काँग्रेसचे माजी नेते डी. बी. चंद्रेगौडा यांचं निधन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी पक्ष संघटनेबाबत चर्चा करण्यासाठी शिवकुमार नवी दिल्लीत गेल्याचे सांगण्यात येत आहे. सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘‘बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही आणि शिवकुमार यांनी ढवळाढवळही केली नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.