मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु असतानाच सिद्धरामय्यांची मंत्री-आमदारांना सक्त सूचना; म्हणाले, आमच्यात कोणतेही मतभेद..

कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
CM Siddaramaiah vs DK Shivakumar
CM Siddaramaiah vs DK Shivakumaresakal
Updated on
Summary

मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री बदलाच्या विषयावर चर्चा न करण्याच्या सक्त सूचना या वेळी सिद्धरामय्यांनी दिल्या.

बंगळूर : कर्नाटकातील लोकसभेच्या २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे आणि तितक्या जागा निश्‍चित जिंकू, असा विश्‍वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी शनिवारी व्यक्त केला. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत (Loksabha Election) चर्चा करण्यासाठी मंत्र्यांसोबत बैठक बोलावली होती.

त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निवासस्थानी अल्पोउपहार बैठकीचे आयोजन केले होते. मंत्री व आमदारांनी मुख्यमंत्री बदलाच्या विषयावर चर्चा न करण्याच्या सक्त सूचना या वेळी त्यांनी दिल्या.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘आमचे लक्ष्य लोकसभेच्या २० जागा जिंकण्याचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत कोणतेही मतभेद नाहीत. विकासकामे सोडून काहीही बोलू नका. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी काही दिवसांपूर्वीच याबाबत न बोलण्याचे निर्देश दिले असल्याने जाहीर वक्तव्ये करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.’’

परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले, ‘१९ मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि केंद्राकडून कोणतीही मदत न मिळण्याबाबत चर्चा केली. राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे सांगून काँग्रेस हायकमांडने या विषयावर न बोलण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.’

बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा झाल्याने सांगून रामलिंगा रेड्डी म्हणाले की, मंत्र्यांना त्यांचे काम करण्यास सांगितले आहे. या संदर्भात केंद्राने काहीही मदत केली नाही. दुष्काळ असूनही केंद्राचे लक्ष नाही. त्यातून एक पैसाही मंजूर झालेला नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी ते केंद्रीय मंत्री मोठ्या संख्येने मते मागायला येत होते; पण आता आम्ही गंभीर संकटात असतानाही कोणी येत नाही.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्राच्या 'या' मागणीमुळं 'कोयना' सापडणार दुहेरी संकटात; राज्यालाही फटका बसण्याची शक्यता

पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांबद्दल ग्राउंड रिपोर्ट सादर करण्याच्या निर्देशाबाबत देखील चर्चा झाली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून सहा महिन्यांत निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी आणि मंत्र्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या निवासस्थानी अल्पोपहार बैठकीचे आयोजन केले होते.

सिद्धरामय्या मंत्र्यांवर नाराज

काही मंत्री कार्यकर्त्यांना उपलब्ध होत नसल्याची तक्रार आली आहे. ही बाब हायकमांडच्या निदर्शनासही आली आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? हायकमांडने तुम्हाला आधीच काही जबाबदारी दिली होती. मात्र, तुम्ही ती जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली नसल्याबद्दल हायकमांडने नाराजी व्यक्त केली, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्र्यांना बैठकीत सांगितले.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
आता अवयवदान करणाऱ्या व्यक्तीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; आरोग्य विभाग महत्त्वाचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत!

जाहीर वक्तव्य नको

कोणत्याही प्रकारचा असंतोष आणि गोंधळ असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर बोला. यावर जाहीरपणे बोलू नका, असे शिवकुमार यांनी बैठकीत सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीत २० हून अधिक जागा जिंकू, असे आश्वासन हायकमांडला दिले आहे. त्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. कोणत्याही कारणास्तव त्याकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी सांगितले.

CM Siddaramaiah vs DK Shivakumar
'त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही'; सुषमा अंधारें‍विरोधात शंभूराज देसाई आक्रमक, पाटण न्यायालयात दाखल केली तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.